Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: अनैतिक संबंधातून गर्भवती; प्रसूतीनंतर अर्भकाला फेकले गटारीत

अनैतिक संबंधातून गर्भवती; प्रसूतीनंतर अर्भकाला फेकले गटारीत

लक्ष्मण सोळुंके

जालना : परतूर तालुक्यातील वाटूर येथून जवळच असलेल्या मंठा तालुक्यातील मोसा गावातील गटारीच्या नाल्यात नवजात स्त्री जातीचे (Jalna News) अर्भक आढळून आले. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी अर्भक फेकणाऱ्या बाळाच्या मातेचा शोध घेऊन तिला ताब्यात घेत हे अर्भक (Crime News) अनैतिक संबंधातून जन्मले असल्याची धकादायक बाब समोर आली आहे. (Maharashtra News)

जालना जिल्‍ह्यातील मोसा गावात शनिवारी सकाळी एका नाल्यात स्त्री जातीचे अर्भक गावकऱ्यांना आढळून आले. यानंतर गावाकऱ्यांनी याची माहिती परतूर पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. या अर्भकाचे जालना येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी गुप्त पद्धतीने या घटनेचा तपास केला असता गावातील एका घरात एका महिलेची प्रसूती झाल्याचे कळाले.

आईकडे येवून केली प्रसुती

पोलिसांना त्या घरात जाऊन तपासणी केली असता घनसावंगी तालुक्यातील एक महिला प्रसूतीसाठी आईकडे आली होती. सदर महिला अनैतिक संबंधातून गर्भवती राहिली होती. तिची घरातच गुप्त पद्धतीने प्रसूती करण्यात आली. प्रसूतीनंतर जन्मलेल्या स्त्री जातीच्या अर्भकाला नाल्यात फेकून देण्यात आले. शविच्छेदनानंतर सरपंचासह पोलिसांनी गावातील नागरिकांच्या उपस्थितीत अर्भकावर पोलिसांच्या उपस्थितीत दफनविधी करण्यात आला. जन्म देणाऱ्या महिलेसह तिच्या आईविरुद्ध परतूर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची २७ तारखेला कर्जतमध्ये सभा

Nanded : कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्याचं अपहरण अन् हत्या; साम टीव्हीच्या बातमीनंतर फायनान्स कंपनीला टाळं

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! दोन्ही राष्ट्रवादीची अचानक बैठक, कोअर कमिटीनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण काय?

Cabinet Reshuffle : राज्यातील ५ मंत्री बदलणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांच्या हालचाली, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Kojagiri Purnima 2026: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीच्या कृपेसाठी चुकवू नका ‘या’ गोष्टी

SCROLL FOR NEXT