महाराष्ट्र

Jalna: ‘एनआयए’च्या कारवाई विरोधात पॉपुलर फ्रंटची निदर्शने; ताब्यात घेतलेल्यांना सोडण्याची मागणी

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : ‘एनआयए’ने देशभरात पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर छापेमारी करून या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना टेरर फंडिंग प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याचा निषेध करण्यासाठी आज जालन्यातील (Jalna) मामा चौकात पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्यावतीने निदर्शने करण्यात आली. (Jalna Today News)

पॉपुलर फ्रंटच्‍या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. ‘एनआयए’ने (NIA) बेकायदेशीर कारवाई करून पॉपुलर फ्रंटच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांना तातडीने सोडण्यात यावे अशी मागणी आंदोलकांनी केली. पोलिसांची (Police) परवानगी नसताना हे आंदोलन करण्यात आले.

आरएसएस, मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

आंदोलनादरम्यान आंदोलकांनी आरएसएस, मोदी सरकारच्या विरोधात आणि ‘एनआयए’च्‍या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. यावेळी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ही मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दोन तासापुर्वी आंदोलनाचा मॅसेज केला व्‍हायरल

दरम्यान पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्यावतीने जालना शहरातील सोशल मीडियावर आंदोलनाबाबत दोन तास अगोदर मॅसेज व्हायरल करण्यात आला होता. त्यानंतर पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मामा चौकात असलेल्या हजरत बिलाल मस्जिद समोर एकत्र येत हे आंदोलन परवानगी नसताना केल्याने पोलिस आता काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुण्यातील रेस कोर्स मैदानावर उद्या नरेंद्र मोदींची सभा

Gujarat News: 600 कोटींहून अधिक किमतीच्या ड्रग्जसह 14 पाकिस्तानी तस्करांना अटक, गुजरातच्या किनारपट्टीवर एनसीबीची मोठी कारवाई

Mint Water Benefits : उन्हाळ्यात रोज प्या पुदीन्याचे पाणी, आरोग्याला होतील ‘असे’ फायदे

Shirur News: बैलगाडा घाटात कौटुंबीक वाद, तुफान हाणामारीत तरुण गंभीर जखमी; शिरुरमधील घटना

Prajakta Mali : "वादळापूर्वीची शांतता..."; प्राजक्ता माळी असं का म्हणतेय ?

SCROLL FOR NEXT