Jalna Civil Hospital Saam tv
महाराष्ट्र

Jalna Civil Hospital : जमिनीवर गादी टाकून रुग्णांवर उपचार; जालना जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक चित्र

Jalna News : सामान्य जनतेसाठी कमी दरात उपचार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय आहेत. दररोजची बाह्य रुग्ण कक्षात ओपीडी केली जाते. तर गंभीर रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेतले जात असते

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: जिल्हा रुग्णालयात सामान्य नागरिकांना उपचार घेण्याची सुविधा आहे. मात्र जालना जिल्हा सामान्य रुग्णालयातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात चक्क रुग्णांवर फरशीवर गाद्या टाकून उपचार सुरू असल्याचे यात दिसत आहे. तर काही ठिकाणी एका बेडवर दोन रुग्ण झोपले असल्याचे दिसून येत आहे. यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचे बोलले जात आहे. 

सामान्य जनतेसाठी कमी दरात उपचार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय आहेत. दररोजची बाह्य रुग्ण कक्षात ओपीडी केली जाते. तर गंभीर रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेतले जात असते. परंतु याच रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचा प्रकार जालना जिल्हा रुग्णालयात पाहण्यास मिळत आहे. हे धक्कादायक चित्र दाखविणारा रुग्णालयातील एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. 

२०० बेडची सोय तरीही..  

जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात जवळपास २०० बेडची सोय आहे. तरी देखील सामान्य रुग्णालयात प्रशासन रुग्णांना फरशीवर गाद्या टाकून उपचार करत असल्याचं समोर आल आहे. तर वार्डात एकाच बेडवर दोन रुग्णांना उपचारासाठी दाखल केले आहे. त्यामुळे जालना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णाच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. 

तर संबंधितांवर कारवाई 

जिल्हा सामान्य रुग्णालयातील जनरल वार्ड मध्ये काल रात्री काशिनाथ येवले या रुग्णावर फरशीवर गादी टाकून उपचार करण्यात आले. दरम्यान कालच्या प्रकाराची सखोल चौकशी करून ज्यांनी जाणीवपूर्वक रुग्णांना फरशीवर उपचार दिले. त्याच्यावर कारवाई करण्यात येईल; अशी प्रतिक्रिया अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI New Rules : UPI युजर्सला मोठा धक्का, ५ हजारांपेक्षा जास्त पाठवल्यास चार्ज लागणार; जाणून घ्या सरकारचा नवा नियम

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

SCROLL FOR NEXT