Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: कोरोनातील दंडाची रक्‍कम लिपिकाने लांबविली; चौकशीत सत्‍य आले समोर

कोरोनातील दंडाची रक्‍कम लिपिकाने लांबविली; चौकशीत सत्‍य आले समोर

लक्ष्मण सोळुंके

जालना : कोरोना काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरीकांकडून दंड वसूल करण्यात आला होता. ही दंडाची 18 लाख 32 हजारांची रक्कम लिपिकाने लांबल्याचे चौकशीत उघड झाले असून लिपिकावर गुन्हा (Crime) दाखल करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी दिले आहेत. (Letest Marathi News)

कोरोना (Corona Virus) काळात राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरीकांना पावती देऊन जालना (Jalna) नगर परिषदेच्यावतीने दंड वसुल करण्यात आला होता. काही महिन्यांपूर्वी कोरोना काळात नागरीकांना करण्यात आलेल्या दंडाच्या पावती पुस्तकात घोळ झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी एक चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीने नगर परिषदेतील लिपिक संतोष अग्निहोत्री याला दोषी ठरवले.

पावती पुस्‍तकाचा हिशोबच नाही

नागरीकांना दंड करण्यासाठी नगर परिषदेचे लिपिक संतोष अग्निहोत्री यांच्याकडे पावती पुस्तक सोपवण्यात आली होती. यातील 51 पावती पुस्तकांचा हिशोब लिपिक अग्निहोत्री यांनी दिला नाही. शिवाय या 51 पावती पुस्तकांच्या अनुषंगाने नागरीकांकडून जमा केलेली 18 लाख 32 हजारांची रक्कमही नगर परिषदेत जमा न करता परस्पर लांबवल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे नगर परिषदेचे लिपिक संतोष अग्निहोत्री यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरमध्ये शिवशक्ती- भीमशक्तीचा आज जनआक्रोश मोर्चा

Uddhav Thackeray : तरेंचं न ऐकल्याचा ठाकरेंना पश्चाताप; म्हणाले, '...तर शिवसेना फुटलीच नसती'

Google Maps Vs Mappls: गुगल मॅप्सला विसरून जा! MAPPLS अ‍ॅपमुळे प्रवाशांना करता येणार सूसाट प्रवास, वाचा खास वैशिष्ट्ये

Famous Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

कोरोनानंतर 'फ्लू'नं डोकं वर काढलं, 'या' देशातील शाळा अन् डे-केअर सेंटर्स बंद; लॉकडाऊन लागणार?

SCROLL FOR NEXT