Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News : अमृत ज्येष्ठ नागरिक सवलत योजनेचा वाहकाकडून गैरव्यवहार; वाहकावर निलंबनाची कारवाई

Jalna News : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या अमृत ज्येष्ठ नागरिक सवलत योजनेमध्ये घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती जालन्यातून समोर येत आहे

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी वेगवेगळ्या सवलती देण्यात आल्या आहेत. यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील सवलत असून या अमृत ज्येष्ठ नागरिक सवलतीत बस वाहकांकडून गैरव्यवहार केल्याचे समोर आले. यावरून सदर वाचकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (MSRTC) ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या अमृत ज्येष्ठ नागरिक सवलत योजनेमध्ये घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती जालन्यातून समोर येत आहे. जालन्यातील (Jalna) परतूर आगाराच्या एका वाहकाने अमृत जेष्ठ नागरिक सवलतीचे जास्तीचे बोगस तिकीट काढून जास्त प्रवाशी संख्या दाखवल्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार उघडकीस आला. यानंतर सदर प्रकरणी विभागीय स्तरावर चौकशी करण्यात आली. यात वाहकाने हा प्रकार केल्याचे उघडकीस आले. 

वाहकावर निलंबनाची कारवाई 

सदर प्रकरणी चौकशी अंती दोषी असलेल्या बस वाहकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. १९ ऑगस्टपासून ते पुढील आदेशापर्यंत वाहकाला निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील अमृत जेष्ठ नागरिक सवलतीचा घोटाळा समोर आला आहे. तसेच पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: भास्कर जाधव यांची विधानसभा गटनेते पदी नियुक्ती

IPL Mega Auction 2025 Live News: आज किती खेळाडूंचं नशीब चमकणार; कोणावर लागणार कोटींची बोली?

तुमच्या वजनानुसार तुम्ही किती पाणी प्यायलं पाहिजे?

Gold-Silver Prices: सोन्याच्या भावात झाली घसरण, पाहा १० ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Raveena Tandon: 'राजकरणात आली तर मला गोळ्या घालतील'; रवीना टंडनला कोणाची भीती?

SCROLL FOR NEXT