Parbhani News : चारित्र्याच्या संशयावरून वाद, रागाच्या भरात पतीने पत्नीला संपवलं; दोन मुले झाली पोरकी

Parbhani Jintur Taluka News : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने औताच्या पासने तिच्या शरीरावर सपासप वार केले. यामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात घडली.
Parbhani Jintur Taluka News
Parbhani Jintur Taluka NewsSaam TV
Published On

पती आणि पत्नीमध्ये वाद होणे ही काही नवीन बाब नाही. संसाराचा गाडा हाकताना दोघांमध्ये नेहमीच वाद होत असतात. अनेकदा हे वाद लगेचच सुटतात तर काहीवेळा ते विकोपालाही जातात. परिणामी मोठमोठ्या गुन्हेगारीच्या घटना घडतात. असाच काहीसा प्रकार परभणीत घडला. एका पतीने आपल्या पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली.

Parbhani Jintur Taluka News
Badlapur News : बदलापूर घटनेप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; चामटोली गावातून २१ वर्षीय तरुणीला अटक

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने औताच्या पासने तिच्या शरीरावर सपासप वार केले. यामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना परभणी जिल्ह्यातील (Parbhani News) जिंतूर तालुक्यातल्या करवली येथे घडली.

ज्योती गिरी असं मृत महिलेचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सतीश गिरी याला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत ज्योती आपल्या दोन मुलांसह शेतआखाड्यावर राहत होती. आरोपी सतीश गिरी याचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय (Crime News) होता. यावरुन दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे.

गुरुवारी ज्योती आणि सतीशमध्ये कडाक्याचं भांडण झालं. वाद इतका विरोपाला गेला, की सतीशने औताच्या लोखंडी पासने ज्योतीवर हल्ला केला. यामध्ये ज्योतीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अतिरक्तस्त्राव झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, सतीशने ज्योतीची हत्या केलीची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. गावातील नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. पंचनामा केल्यानंतर बोरी पोलिसांनी ज्योतीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी आरोपी सतीश याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.

Edited by - Satish Daud

Parbhani Jintur Taluka News
Nashik Crime: सासरचा त्रास, जावयाचा गळफास;पत्नीच्या मैत्रिणीमुळे कुटूंब उद्ध्वस्त

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com