Devendra Fadnavis Vs Manoj Jarange  Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : अटक वॉरंट काढण्याची काय गरज होती; मी काय दहशतवादी आहे का? मनोज जरांगे संतापले, पाहा VIDEO

Manoj Jarange Patil Latest News : अटक वॉरंट काढण्याचा काय गरज होती, मी काय दहशतवादी आहे का? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.

Satish Daud

पुण्यातील एका नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी कोर्टाने मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट काढलं. यावरून जरांगे यांनी चांगलाच संताप व्यक्त केलाय. अटक वॉरंट काढण्याचा काय गरज होती, मी काय दहशतवादी आहे का? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. हा सर्व देवेंद्र फडणवीसांचा खेळ आहे. मला जेलमध्ये टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला. ते अंतरवाली सराटी येथे माध्यमांसोबत बोलत होते.

सगेसोयरेची अधिसूचना काढून राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. आज बुधवारी त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस होता. मात्र, मंगळवारी रात्री मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली. पोटात सातत्याने कळा येऊ लागल्याने त्यांना तातडीने उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र, मनोज जरांगे यांनी उपचारास नकार दिला.

त्यावेळी ४०-५० जणांनी माझे हातपाय दाबून धरले आणि मला जबरदस्तीने सलाईन टोचली, असं जरांगे यांनी माध्यमांना सांगितलं. दरम्यान, सलाईन लावून मी उपोषण करणार नाही. आज दुपारपर्यंत मी उपोषण मागे घेणार, अशी घोषणा जरांगे यांनी केली. त्यांनी राज्य सरकारला आणखी १ महिन्याचा अल्टिमेटम देखील दिला. येत्या १३ ऑगस्टपर्यंत आमच्या मागण्यांवर निर्णय घ्या, अन्यथा पुन्हा उपोषण सुू करणार, असा इशारा जरांगे यांनी दिला.

मनोज जरांगे यांचे फडणवीसांवर गंभीर आरोप

मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील गंभीर आरोप केले. माझ्याविरोधात अटक वॉरंट काढणं हा सर्व देवेंद्र फडणवीस यांचा खेळ आहे. मला जेलमध्ये टाकून त्यांचा मारण्याचा प्रयत्न आहे. बारा तेरा वर्षापूर्वीच वॉरंट आताच का निघालं? तसेच अटक वॉरंट काढण्याची काय गरज होती? मी काय दहशतवादी आहे काय असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला.

देवेंद्र फडणीस हे भाजपला लागलेली कीड आहे, अशी टीकाही जरांगे यांनी केली. माझ्याविरोधात अटक वॉरंट का काढलं याची माहिती मला देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्याच माणसाने दिली आहे. मी याबाबत आता १३ तारखेला बोलणार आहे. न्याय,पोलीस हे सगळे त्यांच्या हातात आहे. त्यामुळं आता हे सगळ सुरू आहे. फडणवीस आणि भुजबळ यांना दंगली घडवून आणायचा आहेत. मराठा समाजाला माझी एक विनंती आहे की जे मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्यासोबत राहू नका. त्यांचा सुपडा साफ करा तेव्हाच माझ्या आत्म्याला शांती मिळेल, असंही जरांगे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Business Idea: कार नसतानाही करा OLA-Uberसोबत व्यवसाय; दरमहा कमवा बक्कळ पैसा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Banana Chips: वेफर्स खाताय सावधान! तुम्ही खाताय सडलेल्या केळीचे वेफर्स

Mumbai Ahmedabad Bullet Train: समुद्राखालून ३२० किमी वेगाने धावेल मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, जाणून घ्य कसा असेल मार्ग

Shocking : ३१ वर्षांच्या तरुणाने केली हद्दपार, १००० महिलांसोबत शरीरसंबध, पण आता...; जगभरात होतेय चर्चा

NEET Exam: 'नीट'चं टेन्शन, विद्यार्थ्यांनी संपवलं जीवन; विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

SCROLL FOR NEXT