Jalna News Kidnapping
Jalna News Kidnapping Saam tv
महाराष्ट्र

Jalna: आई करत होती शेतीकाम; झोक्यात झोपलेल्या दीड वर्षीय मुलीचे अपहरण

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : झोक्यात झोपलेल्या एका दीड वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना जालन्यातील (Jalna) निधोणा गावच्या शिवारात घडली. श्रावणी डकले असं अपहरण (Kidnapping) करण्यात आलेल्या दीड वर्षाच्या चिमुकलीचं नाव आहे. (Jalna News Girl Kidnapping)

सिल्लोड तालुक्यातील गव्हाणी गावातील डकले कुटुंब शेतीकाम करण्यासाठी निधोणा गावात आलेले आहेत. आज सकाळी दीड वर्षाची चिमुकली झोक्यात झोपलेली होती. याच वेळी तिची आई शेतीकाम करत असताना हे अपहरण (Crime) नाट्य घडले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

अपहरण की घातपात

नेमकं हे अपहरण की घातपात याचा पोलीस कसून तपास करत आहेत. पोलीस घटनास्थळी पोहचल्यानंतर काही वेळेतच घटनास्थळी श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. परंतु या श्वानांना माग घेता आला नाही. त्यामुळे या प्रकरणात खरंच अपहरण झाले आहे? की आणखी काही घातपात आहे. याचा पोलीस कसून तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

SCROLL FOR NEXT