Eknath Khadse: पंकजा या मोदींना आव्हान देऊ शकत नाहीत, पण त्‍यांची नाराजी स्वाभाविक: एकनाथ खडसे

पंकजा ह्या मोदींना आव्हान देऊ शकत नाहीत, पण त्‍यांची नाराजी स्वाभाविक; एकनाथ खडसे
Eknath Khadse Pankaja Munde
Eknath Khadse Pankaja MundeSaam tv

जळगाव : पंकजा मुंडे यांनी केलेले वक्तव्य जनतेच्या मनात असेल; तर मोदीही हरवू शकणार नाहीत. हे वक्तव्य कोणत्या हेतूने केले अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही. त्‍यांनी नाराजी स्‍वाभाविक आहे. मोदीजीचे नाव त्यांनी कोणत्या अर्थाने घेतले हे मी सांगू शकत नाही. शिवाय मोदींना आव्हान देण्याची भाषा असेल तर ते दुर्दैवी आहे. पंकजा (Pankaja Munde) ह्या मोदींना आव्हान देऊ शकत नाहीत तसा अर्थ घेऊ नाही; असे मत आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी व्‍यक्‍त केले. (Jalgaon Eknath Khadse News)

Eknath Khadse Pankaja Munde
Gram Panchayat Election: ग्रामपंचायतीत सर्वच अपक्ष बिनविरोध; निवडीचा आजच केला जल्‍लोष

भाजपच्‍या (BJP) पंकजा मुंडे यांनी बीड (Beed) येथे एका कार्यक्रमात मोदींनी ठरविले तरी मला हरवू शकत नाही; असे वक्‍तव्‍य केले होते. यावर एकनाथ खडसे यांनी आपले मत व्‍यक्‍त केले. खडसे यांनी सांगितले, की स्व. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) आणि पंकजा मुंडे यांनी भारतीय जनता पार्टीचा विस्तार तळागाळापर्यंत करण्याचा प्रयत्न केला. भाजप हा पक्ष बहुजन समाजापर्यंत नेण्याचे काम मुंडे साहेबांमुळेच झाले आहे. अजूनही पंकजा मुंडे यांची वाटचाल हीच आहे. त्यामुळे स्वाभाविक पंकजा मुंडे यांना असे वाटते की मी जनतेच्या मनामनामध्ये असेल. त्यामुळे त्यांना कोणीही पराभूत करू शकत नाही; असं त्यांना वाटलं असेल.

मान सन्‍मान मिळाला पाहिजे

ही गोष्ट खरी आहे अनेक वर्ष पंकजा मुंडे यांनी परिश्रम करून पक्षाला चांगले दिवस आणून दिले. मुंडे साहेबांमुळेच भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात यश मिळण्यास मदत झाली. त्यामुळे स्वाभाविक पक्षांमध्ये अपेक्षा असते सन्मानाचे स्थान मिळाले पाहिजे. मान सन्मान मिळाला पाहिजे.

सावंतांनी माफी मागावी

तानाजी सावंत यांनी मराठा समाजाबद्दल आरक्षणाबाबत आत्ताच का मराठा समाजाला खाज सुटली असे वक्तव्य केले; ते वक्तव्य निषेधार्य आहे. सावंत यांनी मराठा समाजाविषयी केलेले वक्तव्य हे अपमानास्पद वक्तव्य असून या विषयाचा निषेध करतो. सावंत यांनी याविषयी माफी मागितली पाहिजे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com