Jalna Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Jalna Heavy Rain : जालन्यात पावसाचा कहर; विरेगाव येथे पुराच्या पाण्यात शेतकरी शेतातच अडकले, मदतीसाठी बचाव पथक रवाना

Jalna News : दहा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी, तर सर्वाधिक पाऊस सेवली महसूल मंडळामध्ये झाल्याची नोंद करण्यात आली. नदीच्या पुराचे पाणी शेतात शिरल्याने सात शेतकरी शेतात अडकले असून सर्वदूर पाणीच पाणी आहे

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 

जालना : जालना जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. यामध्ये जालना जिल्ह्यातील दहा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून सर्वाधिक सेवली महसूल मंडळामध्ये पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे काही भागात पूरस्थिती निर्माण झाली असून जिल्ह्यातील विरेगाव येथे पुराच्या पाण्यात शेतकरी शेतात अडकून पडले आहेत. त्यांना वाचविण्यासाठी बचाव पथक रवाना झाले आहे.

जालना जिल्ह्यात जोरदार पावसाने तडाखा दिला आहे. या पावसामुळे सर्वत्र हाहाकार माजला असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील दहा मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. रात्री ३ वाजेपासून ते सकाळी ७ वाजेदरम्यान जालना जिल्ह्यात सरासरी २९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. रात्री झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले असून अनेक भागांमध्ये सोयाबीन आणि कपाशी पिके पाण्याखाली गेली आहे.

पुरात शेतकरी अडकले 

जालन्यातील विरेगाव येथे पुराच्या पाण्यामुळे शेतकरी शेतात अडकले आहेत. शेता शेजारील कल्याणी नदीला अचानक पूर आल्याने शेतकरी शेतात अडकले. विरेगाव येथील जवळपास सात शेतकरी शेतात अडकले असून चहुबाजूनी पाणीच पाणी आहे. या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बचाव पथक रवाना झाले असून जालना तहसीलदारांनी बचाव पथक आणि महसूल कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवल आहे. 

या महसूल मंडळांमध्ये झाली अतिवृष्टी

जालना जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास झालेल्या अतिवृष्टीत जालना शहर ७६ मिमी, सेवली १११ मिमी, रामनगर ७६ मिमी, पाचनवडगाव ७६ मिमी, जामखेड ६५ मिमी, रोहिलगड ६५ मिमी, सुखापुरी ६७ मिमी, बदनापूर ६५ मिमी, शेलगाव ६५ मिमी व रोशनगाव ६६ मिमी इतका पाऊस झाला आहे. काही तासातच हा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शरद पवार भाकरी फिरवणार? आबांच्या मुलाला मिळणार मोठी जबाबदारी

PM Kisan Yojana: कामाची बातमी! या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा हप्ता; कारण काय?

Maharashtra Election : एकनाथ शिंदेंना जबर धक्का, भाजप-राष्ट्रवादीची 'या' ठिकाणी झाली युती

मोठी बातमी! यशवंत बँकेत तब्बल ११२ कोटींचा घोटाळा, भाजप नेत्यावर गुन्हा, साताऱ्यात खळबळ

Crime News : दुप्पट परताव्याच्या आमिषाला भुलली तरुणाई, सायबर चोरट्यांनी घातला कोट्यावधींचा गंडा; काय आहे नेमकं प्रकरण ?

SCROLL FOR NEXT