Jalna Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Jalna Heavy Rain : जालन्यात पावसाचा कहर; १५ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी, शेतीचे अतोनात नुकसान

Jalna News : राज्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजविला असून मराठवाड्यात अक्षरशः पावसाने झोडपून काढले आहे. रात्रीच्या सुमारास जालना जिल्ह्यात झालेल्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान केले आहे

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: राज्यात सर्वदूर सुरु असलेल्या पावसाने कहर माजविला आहे. त्यानुसार जालना जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत असून जालन्यातील १५ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. यात जालना आणि अंबड तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली असून शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. कापसाचे पीक पूर्णपणे पाण्याखाली गेले असून शेतकऱ्याला यात मोठा फटका बसला आहे.

जालना जिल्ह्यामध्ये काल मध्यरात्री सर्वदूर मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची खरीप पिके पाण्याखाली गेल्याने अतोनात नुकसान झाल आहे. तर जालना शहरातील अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उपयोगी वस्तू अन्य धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जालना जिल्ह्यामध्ये काल पंधरा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.

शेतकऱ्याचा शेतातील पाण्यात बसून आक्रोश
जालना शहरात आणि जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेत शिवाराला तलावाचे स्वरूप आले आहे. शेतातील उभी पिक पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान बदनापूर तालुक्यातील काजळा गावात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीनच मोठे नुकसान झाले. दरम्यान बदलापूर तालुक्यातील काजळा परिसरामध्ये नुकसानीची पाहणी करण्यासाठी तहसीलदारांचे पथक बांधावर गेले असता शेतकऱ्यांनी हा आक्रोश व्यक्त केला. 

जिल्ह्यात एका दिवसात ४८.८ टक्के सरासरी पाऊस
जालना जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून एका दिवसात जिल्ह्यात ४८.८ टक्के सरासरी पाऊस झाला आहे. यात जालना शहर ८१ मिमी, जालना ग्रामीण ८९ मिमी, अंबड शहर १२६ मिमी, अंबड तालुका ८०.९ मिमी, घनसावंगी तालुका ६९.१ मिमी, बदनापूर तालुका ३५.७ मिमी, भोकरदन तालुका १९.७ मिमी, जाफराबाद तालुका ३६.९ मिमी, परतूर तालुका ४३.८ मिमी आणि मंठा तालुका ३१ मिमी झाला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: फैजपूर येथे भीषण अपघात; एक गाडी पुलावरून खाली कोसळली

Railway Expansion: राज्यातील ४८ रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार! पुणे, नाशिक, कोल्हापूर, बीडकरांना होणार फायदा; रेल्वे मंत्र्यांची घोषणा

आम्ही बोललो तर तुमची अडचण होईल, Ravindra Chavan यांचा Ajit Pawar यांना इशारा

Ready To Wear Saree Designs: Ready To Wear Saree Designs: 'रेडी टू वेअर' साड्यांचे 5 ट्रेडिंग पॅटर्न, अवघ्या 5 सेकंदात नेसा साडी

Blood Pressure: सकाळच्या ३ सवयी शरीर खिळखिळा करून टाकतील, BP वाढेल

SCROLL FOR NEXT