Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: विक्रीसाठी आणलेली फुलं शेतकऱ्यांनी फेकली नाल्यात; फुलांचाही भाव कोसळला

विक्रीसाठी आणलेली फुलं शेतकऱ्यांनी फेकली नाल्यात; फुलांचाही भाव कोसळला

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालन्यात भाजीपाल्याला कमी दर मिळत आहे. अशातच आता फुल उत्पादक शेतकरीही (Farmer) फुलांचे भाव कोसळल्याने हैराण झाले आहेत. व्यापाऱ्यांनी फुलांना योग्य भाव न दिल्यानं आज शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली फुलं नाल्यात फेकून दिली. (Breaking Marathi News)

अवकाळी पावसामुळे शेतकरी अगोदरच संकटात सापडलेला आहे. यात शेतकरी पिकवत असलेल्‍या उत्‍पादनाला अगदी कवडीमोल भाव मिळत आहे. कापसाचे भाव वाढत नसल्‍याने शेतकरीला भाववाढीची प्रतिक्षा आहे. तसेच (Jalna News) भाजीपाला पिकवित असलेल्‍या शेतकरी देखील भाव मिळत नसल्‍याने संकटात आहे. आता फुल उत्‍पादक शेतकरी देखील संकटात सापडला आहे. फुलांना भाव मिळत नसल्‍याने फुले रस्‍त्‍यावर व नाल्‍यात फेकून दिली आहेत.

गुलाब, मोगरा फेकला नाल्‍यात

परतूर शहरातील साईबाबा चौकात ही घटना घडली. राब राब राबून विक्रीसाठी आणलेल्या फुलांना कवडीमोल भाव मिळत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी फुलांची विक्री न करता 15 ते 20 क्विंटल मोगरा, गुलाब ही फुलं नाल्यात फेकून देत व्यापाऱ्यांचा निषेध नोंदवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tharala Tar Mag! : "सगळे पुरावे खोटे..."; अर्जुननं कोर्टात बाजी पलटली, सायलीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी लढवली अनोखी शक्कल| VIDEO

Maharashtra News Live Update : वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पाचा जलसाठा पोहोचला 35 टक्क्यांवर

Highway tyre puncture: हायवेवर टायर पंक्चर झाल्यास काय कराल?

Oral Health Tips: रोज फक्त 2 मिनिटांचा हा उपाय ठरू शकतो दातांसाठी फायदेशीर; डॉक्टरांनी सांगितल्या तोंडाच्या आरोग्याच्या महत्त्वाच्या सवयी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? ८ दिवसांत पैसे जमा होण्याची शक्यता, महत्त्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT