Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna CIDCO Project : जालन्यातील खरपुडी येथील सिडको प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध; कमी मोबदला दिल्याचा आरोप

Jalna News : जालन्यातील खरपुडी येथील होणाऱ्या सिडको प्रकल्पाला आता स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला सिडको मधील संपादित होणाऱ्या शेतकऱ्यांना समान मोबदला देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: जालना येथील खरपुडी येथे सिडकोचा नवीन प्रकल्प उभारला जात आहे. यामुळे यात काही शेतकऱ्यांची जमीन जात आहे. मात्र सिडकोने व्यापाऱ्यांच्या जमिनीला अधिकचा मोबदला दिला असून शेतकऱ्यांच्या जमिनीला कमी मोबदला दिल्याचा आरोप करत या प्रकल्पाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. 

जालन्यातील खरपुडी येथील होणाऱ्या सिडको प्रकल्पाला आता स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. सिडको मधील संपादित होणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना समान मोबदला देण्याची मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान या प्रकल्प उभारणीसाठी जमीन संपादित केली जात आहे. यामध्ये व्यापाऱ्यांसह काही शेतकऱ्यांच्या जमिनी देखील जात आहेत. या जमिनीचा मोबदला सिडकोकडून देण्यात येत आहे. 

जालन्यातील खरपुडे येथे होत असलेल्या सिडको प्रकल्पामध्ये काही शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळत असून काही शेतकऱ्यांना अल्प मोबदला देण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. यासाठी आज खरपुडी येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत या विरोधात आंदोलन करत घोषणाबाजी केली आहे. तसेच प्रकल्प उभारणीस विरोध दर्शविला आहे. 

समान मोबदला देण्याची मागणी 

दरम्यान सिडकोने व्यापाऱ्यांना अधिकचा मोबदला दिला असून स्थानिक शेतकऱ्यांना मात्र कमी मोबदला दिल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे. तर आम्हाला समान मोबदला मिळाला नाही; तर आम्ही देखील आमच्या जमिनी सिडकोला देणार नसल्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Fighting Viral Video: कारमध्ये बसवून धू धू धुतलं, आधी मुलीनं मारलं; नंतर मित्रानेच ९० सेकंदात २६ वेळा तरुणाच्या कानशिलात लगावल्या| पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: मथुरेत पावसाचा हाहाकार, यमुना नदीचे पाणी घरात शिरलं

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर वाढले; १० तोळ्यामागे ८,७०० रुपयांनी वाढ, वाचा आजचे भाव

Fruits For Kidney : आहारात या ६ फळांचा समावेश केल्यास मूत्रपिंडासाठी ठरतील वरदान, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT