Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna : मी चाललो मला माफ करा; भावनिक चिठ्ठी लिहीत दिवाळीच्या दिवशीच शेतकऱ्याचे टोकाचं पाऊल

Jalna News : यंदाच्या पावसाळ्यात शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. हि परिस्थिती राज्यात सर्वदूर पाहण्यास मिळत असून पिकांचे नुकसान होऊन हातात पैसा नसल्याने शेतकरी टोकाचा निर्णय घेत आहेत.

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 

जालना : यंदा शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. शेतातील मालाचे नुकसान झाल्याने हातात उत्पन्न आले नाही. यामुळे आर्थिक संकट उभे आहे. यामुळे घराचा गाडा चालवायचा कसा? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. अशात दिवाळी सणाला मुलांना कपडे घेण्यासाठी पैसे नसून मुलांना काय सांगावे; मी चाललो मला माफ करा; अशी भावनिक चिठ्ठी लिहीत शेतकऱ्याने दिवाळीच्याच दिवशी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 

जालन्यातील शेवगा गावात घटना घडली आहे. रामेश्वर खंडागळे असे मयत शेतकऱ्याचं नाव आहे. यंदा मुसळधार पाऊस व संततधार पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. यात अल्पभूधारक शेतकरी तर मोठ्या संकटात सापडला असून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा; असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. यातूनच जालन्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. 

दिवाळी आली, माझ्याकडे पैसे नाहीत.. 

पावसामुळे नुकसान झाल्याने उत्पन्न न आल्याने हातात पैसे आला नाही. दिवाळी आली पोरं कपडे, फटाक्याला पैसे मागायले. माझ्याकडे पैसे नाहीत, त्यायला काय सांगू. अनुदान आलं असतं तर दिवाळी झाली असती. मी चाललो मला माफ करा., अशी भावनिक चिठ्ठी लिहीत रामेश्वर खंडागळे यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक  घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. 

दिवाळीच्या दिवशी टोकाचे पाऊल 
भावनिक चिठ्ठी लिहून शेतकऱ्याने शेतात जात झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. एन दिवाळीच्याच दिवशी शेतकऱ्याने आत्महत्या केल्यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान घटनास्थळी जाऊन जालन्यातील मौजपुरी पोलिसांनी पंचनामा केला असून त्यांच्याकडे सापडलेली चिठ्ठी देखील जप्त केली आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे कुटूंबाला मोठा आघात बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eyebrow Care: आयब्रो डार्क दिसत नाहीत? मग नॅचरल टिप्स फॉलो करा काहीच दिवसात जाणवेल फरक

Moisturizer: जास्त मॉइश्चरायझर लावल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये खाजगी बस आणि एसटी बसचा अपघात

Bihar : बिहारच्या राजकारणाला धक्कादायक वळण; स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या JMM ची निवडणुकीतूनच माघार

Parbhani Crime: जंगालात फिरणाऱ्या जोडप्याला ६ जणांनी घेरलं; तरुणासमोरच तरुणीवर सामूहिक अत्याचार, बलात्कारानंतर...

SCROLL FOR NEXT