Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Fraud : हमीभावात सोयाबीन विकण्यासाठी बनावट सातबारा, पीकपेरा; जालन्यातील धक्कादायक प्रकार, शासनाची कोट्यावधीची फसवणूक

Jalna News : जालन्यातील अन्वा येथील विर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेने सोयाबीन हमीभावात विकण्यासाठी बनावट सातबारा उतारे आणि खोटा पीकपेरा जोडून शासनाची फसवणूक केल्याचे उघडकीस

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: सरकारने सोयाबीनला हमीभाव देत खरेदी केंद्र सुरु केले होते. अर्थात या ठिकाणी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच सोयाबीन विक्री करता येणार होती. मात्र जालन्यात हमीभावात सोयाबीन विकण्यासाठी बनावट सातबारा उतारा, खोटा पिकपेरा जोडून शासनाची जवळपास १ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. 

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या सोयाबीन पिकाला हमीभाव मिळावा; यासाठी सरकारकडून खरेदी केंद्र सुरु केले होते. याठिकाणी सोयाबीन विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करणे आवश्यक होते. असे असताना जालन्यातील अन्वा येथील विर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेने सोयाबीन हमीभावात विकण्यासाठी बनावट सातबारा उतारे आणि खोटा पीकपेरा जोडून शासनाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. 

२०९३ क्विंटल सोयाबीनचा खोटा पीकपेरा 

दरम्यान विर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सहकारी या संस्थेने २०२४- २०२५ मध्ये शेतकऱ्यांकडून एकूण ३९ हजार क्विंटल सोयाबीन खरेदी केली आहे. त्यापैकी २०९३ क्विंटल जास्तीच्या सोयाबीन पीकपेऱ्याची नोंद करुन हा अपहार केल्याचे प्रथमदर्शनी उघडकीस आला आहे. यामध्ये साधारण १ कोटी रुपयांची फसवणूक शासनाची करण्यात आली आहे. 

दहा जणांवर गुन्हा दाखल 

फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी प्रभारी पणन अधिकारी विजय राठोड यांच्या फिर्यादीवरुण पारध पोलीस ठाण्यात सहकारी संस्थेच्या अध्यक्षासह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणात पणन अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. आता या प्रकरणी काय कारवाई होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Thackeray Vs Shinde : ठाकरेंना शिंदेंचा झटका; आता 'सोशल' स्ट्राइक, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी शिंदेसेनेत

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT