Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Farmer Relief Fund Scam : अतिवृष्टी अनुदानात १८ कोटी रुपयांचा घोटाळा; गाव तपासणींसाठी १५ दिवसांची मुदत

Jalna News : जालन्यात शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदानात तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांनी घोटाळा केल्याचे उघड झालं होतं. सर्वप्रथम साम टीव्हीने हा घोटाळा समोर आणला होता

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 

जालना : अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची भरपाईपोटी शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत निधी सरकारकडून देण्यात आला होता. मात्र जालन्यातील घनसावंगी आणि अंबड तालुक्यात शेतकऱ्यांच्या अनुदानामध्ये १८ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी त्रिसदस्य समिती नेमली होती. या घोटाळ्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला असून यातून हि आकडेवारी समोर आली आहे.  

जालन्यात शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदानात तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांनी घोटाळा केल्याचे उघड झालं होतं. सर्वप्रथम साम टीव्हीने हा घोटाळा समोर आणला होता. यानंतर जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्रिसदस्य समिती समिती नेमून या घोटाळ्याची चौकशी सुरू केली होती. या घोटाळ्याची जालन्यातील घनसावंगी आणि अंबड तालुक्यातील चौकशी पूर्ण झाली असून या समितीने अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केला आहे. 

आणखी गावांची होणार तपासणी 

घनसावंगी आणि अंबड तालुक्यात वाटण्यात आलेल्या ७५ कोटी अनुदानावर आक्षेप नोंदण्यात आला होता. यापैकी जवळपास २२ कोटींचे विवरण संबंधित तलाठी यांनी सादर केले आहे. तर १८ कोटींचा हिशोब न दिल्यामुळे हे पैसे बोगस पद्धतीने वाटल्याचे अहवालात समोर आला आहे. तर परतूर, मंठा,जालना, बदनापूर, भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील गावे तपासण्यासाठी समितीला पंधरा दिवसाची मुदत देण्यात आली आहे  त्यामुळे या घोटाळ्याचा आकडा अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

२५ तलाठ्यांवर होणार कारवाई 

दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी जबाबदारी निश्चित करून रक्कम वसुलीचे आदेश दिल्यानंतर आतापर्यंत जवळपास तीन कोटींची रक्कम शासन खात्यात जमा करण्यात आली आहे. तर जिल्ह्यातील जवळपास २५ तलाठ्यांना वारंवार नोटीस देऊन देखील सुनावणीसाठी हजर राहत नाही. त्यामुळे हजर न राहणाऱ्या तलाठ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

SCROLL FOR NEXT