Jalna Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Jalna Water Crisis : जालन्यात दुष्काळाच्या झळा; पाण्याअभावी द्राक्ष बागांवर फिरवताय कुऱ्हाड

Jalna News : संदीप क्षिरसागर यांनी पाण्याअभावी चार एकर द्राक्ष बागावर कुऱ्हाड चालवली आहे. पाण्याअभावी कडवंची गावातील अनेक शेतकरी हतबल झाले असून गावातील शेतकरी आता द्राक्षबागांवर कुऱ्हाड चालवत आहे

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: राज्यात एकीकडे अवकाळीच थैमान सुरु असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तर जालना जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट भीषण होत चालले आहे. मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवत असून पिकांना पाणी कसे द्यायचे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. याचा परिणाम म्हणून पाण्याअभावी द्राक्ष बागांवर कुऱ्हाड चालविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 

जालना जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच दुष्काळाची दाहकता जाणवत असून जिल्ह्यात द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या कडवंची गावातील शेतकरी पाण्याअभावी आपल्या द्राक्ष बागांवर कुऱ्हाड चालवत आहेत. राज्यात एकीकडे अवकाळीच थैमान सुरू असताना जालना जिल्ह्यात मात्र पाणीटंचाईचा सावट पाहायला मिळत आहे. पुढील दोन- अडीच महिने पाण्याची हि समस्या अधिक गडद होण्याचे चित्र आहे. 

चार एकर बागेवर चालविली कुऱ्हाड 

जालना जिल्ह्यातील कडवंची येथील शेतकरी संदीप क्षिरसागर यांनी पाण्याअभावी चार एकर द्राक्ष बागावर कुऱ्हाड चालवली आहे. पाण्याअभावी कडवंची गावातील अनेक शेतकरी हतबल झाले असून गावातील शेतकरी आता द्राक्षबागांवर कुऱ्हाड चालवत आहे. जिल्ह्यातील द्राक्षांचा पंढरी म्हणून कडवंची गावाची ओळख असून पाण्याअभावी आता या कडवंची गावाची द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख पुसण्याची भीती आता शेतकरी व्यक्त करत आहेत. 

पुढील चित्र अधिक गडद 
दरम्यान उन्हाची दाहकता वाढत असताना विहिरीतील पाणी देखील आटू लागले आहे. नदी, तलाव, धरणातील पाणी पातळी देखील कमी होत आहे. परिणामी पाण्याचे स्रोत आटू लागल्याने पिकांना पाणी देण्याचा प्रश्न आतापासूनच भेडसावत आहे. तर पुढील दोन- अडीच महिन्यात उन्हाची दाहकता वाढण्यासोबत पाण्याची समस्या देखील अधिक गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्ह्यात घेणार तीन प्रचार सभा

Shukraditya Rajyog: 365 दिवसांनंतर गुरुच्या राशीत बनणार शुक्रादित्य योग; 'या' राशींच्या घरी सोनपावलांनी लक्ष्मी येणार घरी

RBI Repo Rate: होम लोन आणखी स्वस्त होणार; RBI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? भाजपसोबतच्या तणावादरम्यान मंत्र्याचं मोठं विधान

Zodiac signs prediction: आजचा दिवस चार राशींसाठी बदल घडवणारा! निर्णय, नोकरी आणि प्रवासात मिळणार यश

SCROLL FOR NEXT