Dhangar Reservation Saam tv
महाराष्ट्र

Dhangar Reservation: तर सरकारला सत्तेवरून खाली खेचू; आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा महामोर्चा

Jalna News : २०१४ ला भाजप सरकार सत्तेवर येत असताना त्यांनी धगनगर समाजाला एसटी प्रवर्गात सामाविष्ट करण्याचं आश्वासन दिलं होतं

लक्ष्मण सोळुंके

जालना : आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात धनगर समाजानं महामोर्चा काढला आहे. गांधी चमन ते (Jalna) जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. प्रामुख्याने (Dhangar Reservation) धनगर समाजाचा एसटी प्ररवर्गात सामाविष्ट करण्याच्या मागणीसाठी हा महामोर्चा काढण्यात आला आहे. (Tajya Batmya)

मराठा समाजाने आरक्षणासाठी (Maratha Aarkshan) मोठे आंदोलन उभारले आहे. जरंगे पाटील यांनी जालन्यातच बेमुदत उपोषण केले. यानंतर जालन्यात धनगर समाजाने आरक्षणासाठी आज महामोर्चा काढला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाजाचा समावेश हा एसटी प्रवर्गात केलेला आहे.. मात्र मागच्या ७० वर्षापासून या प्रस्तापीत राज्यकर्त्यांनी धनगर समाजाला एसटी प्रवर्गापासून वंचित ठेवलेलं आहे. याच मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सरकार समाजाला विसरले 

२०१४ ला भाजप सरकार सत्तेवर येत असताना त्यांनी धगनगर समाजाला एसटी प्रवर्गात सामाविष्ट करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र मागच्या दहा वर्षांपासून ते त्यांचं आश्वासन विसरले आहेत. त्यामुळं आता जर सरकारनं धनगर समाजाला विसरले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर समाजानं हा मोर्चा काढलाय. जर धनगर समाजाला एसटी प्रवर्गात सामाविष्ट केलं नाही; तर सरकारला सत्तेवरून खाली खेचू असा इशाराही यावेळी देण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT