Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Heavy Rain : ढगफुटी सदृश्य पावसाने होत्याचे नव्हते केले; शेताला तलावाचे स्वरूप, दोन एकर सोयाबीनची गंज पाण्याखाली

Jalna News : जालना जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजविला असून शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. कापून ठेवलेला सोयाबीन शेतात साचलेल्या पाण्यात पूर्णपणे भिजला आहे. 

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 

जालना : जालना जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजविला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. यातच जालन्याच्या दहिफळ परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. काढून ठेवलेली सोयाबीनची गंज पूर्णपणे पाण्यात भिजली असल्याने हातातोंडाशी आलेले सोयाबीनचे पीक पाण्याखाली गेले आहे. 

जालना जिल्ह्यात अनेक भागात काल मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस पडला. यात दहिफळ परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असल्याने शेतांमध्ये पाणीच पाणी साचले आहे. दरम्यान दहिफळ येथील शेतकरी मारुती चौधरी यांनी काल दिवसभर सोंगून ठेवलेल्या सोयाबीनचा गंज पाण्याखाली गेला आहे. या शेतकऱ्यांनी काल दिवसभरात जवळपास दोन एकर सोयाबीनची सोंगणी करून गंज मारून ठेवला होता.

हातातोंडाशी आलेला घास हिरावला 

काल मध्यरात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि शेताला तलावाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे हा सोयाबीनचा गंज पाण्याखाली गेला. काढून ठेवलेल्या सोयाबीनचा गंज पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. माझ्यावरती दोन लाख रुपये कर्ज आहे ते कसं फेडायचं असा सवाल देखील शेतकऱ्यांना उपस्थित केला आहे.

मुसळधार पावसाने शेतात पाणीच पाणी, शेतकरी हवालदिल
नाशिक : नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील दाभाडी, पिंपळगाव, काष्टी या परिसरात काल रात्री दोन तास झालेल्या मुसळधार पावसाने संपुर्ण परिसराला झोडपले. या परिसरातील शेतात पाणीच पाणी साचले आहे. तर डाळींब बागां तसेच कांद्याचे रोपे पाण्याखाली गेले. आधिच सुलतानी संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आस्मानी संकटाचा सामना करावा लागत असून शेती पिकाच नुकसान होत असल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करताय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: कामाची बातमी! या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा हप्ता; कारण काय?

Maharashtra Live News Update: शरद पवार भाकरी फिरवणार? आबांच्या मुलाला मिळणार मोठी जबाबदारी

Maharashtra Election : एकनाथ शिंदेंना जबर धक्का, भाजप-राष्ट्रवादीची 'या' ठिकाणी झाली युती

मोठी बातमी! यशवंत बँकेत तब्बल ११२ कोटींचा घोटाळा, भाजप नेत्यावर गुन्हा, साताऱ्यात खळबळ

Crime News : दुप्पट परताव्याच्या आमिषाला भुलली तरुणाई, सायबर चोरट्यांनी घातला कोट्यावधींचा गंडा; काय आहे नेमकं प्रकरण ?

SCROLL FOR NEXT