Badnapur Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Badnapur Heavy Rain : बदनापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; शेतातील पिके पाण्याखाली, शेतकऱ्यांचे नुकसान

Jalna News : पावसामुळे नद्या आणि ओढ्यांना पूर आला आहे. परतूर तालुक्यातील कुंभारवाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांचा पुराच्या पाण्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास सुरू असल्याचे समोर आले आहे

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: जालना जिल्ह्याला आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानुसार दुपारी तीन वाजेपासून जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावत चांगलेच झोडपून काढले आहे. पावसाचा जोर अधिक असल्यामुळे शेतामध्ये पाणी साचल्याने शेतांना तळ्याचा स्वरूप प्राप्त झालं होतं. त्यामुळे खरीप हंगामातील कपाशी, सोयाबीन, मका यासह अन्य पिके पूर्णतः पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तडाखा बसला आहे.

जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरासह पिरसावंगी, पाडळी, मात्रेवाडी, शेलगाव यासह इतर आसपासच्या परिसरात पाऊस जोरदार बरसला. या ठिकाणच्या शेतातील पिके पूर्णतः पाण्याखाली गेल्याने मोठं नुकसान झालं. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी; अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. दरम्यान मागील चार ते पाच दिवसापासून जालना जिल्ह्यात पाऊस हजेरी लावत आहे. आज दुपारनंतर या पावसाचा जोर अधिकच वाढला आणि शेतकऱ्यांची चांगली दाणादाण उडून दिली.

पुराच्या पाण्यातून विद्यार्थ्यांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास
जालना जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस पडत आहे. परतूर आणि मंठा या तालुक्यांमध्ये मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे नद्या आणि ओढ्यांना पूर आला आहे. परतूर तालुक्यातील कुंभारवाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांचा पुराच्या पाण्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास सुरू असल्याचे समोर आले आहे. 

मुसळधार पावसामुळे कुंभारवाडी ते गोळेगाव या रस्त्यावरील ओढ्याला पूर आला आहे. या पुराच्या पाण्यातूनच विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा जीवघेणा प्रवास सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. परतुर तालुक्यातील गोळेगाव ते कुंभारवाडी वस्तीवरील पुलावरून सध्या पाणी वाहत आहे. अशा परिस्थितीत शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थ या पुलावरून पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करत आहे. या पुलाची उंची वाढवण्याची मागणी ग्रामस्थ करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT