case registered against former mp imtiaz jaleel  Saam Tv
महाराष्ट्र

Jalna News: तिरंगा रॅलीत प्रक्षोभक भाषण, इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय म्हणाले?

case registered against former mp imtiaz jaleel :

Priya More

अक्षय शिंदे, जालना

छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केल्याप्रकरणी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालन्यातील बदनापूर पोलिस ठाण्यामध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक येथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केला होता. 'ए औरंगजेब का आबाद शहर था और रहेगा, इसे हम संभाजीनगर बनने नही देंगे.', असे प्रक्षोभक भाषण करून त्यांनी संभाजी महाराजांचा अपमान केला होता. तिरंगा रॅलीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत नाशिक येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीनंतर छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात जालन्यातील बदनापूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरच्या नामनिर्देषित फलकावरील छत्रपती संभाजीनगर या नावावर काळे फासवून विद्रुपीकरण केल्या प्रकरणी देखील इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे इम्तियाज जलील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संतोष देशमुख हत्या प्रकरण, साक्षीदाराच्या भावाला धमकी

'तटकरेंना आमचा विरोध', शिंदेंसेनेच्या आमदाराच्या मुलीनं भरला उमेदवारी अर्ज, कोकणात युतीला तडा

Kalyan : साखरपुडा मोडून मुलीनं बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं, वडील संतापले, नवविवाहीत माहेरी येताच नको ते करून बसले

New Marathi Serial: मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच; तीन महिन्यांत सुरु होणार आठ नव्या मालिका

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या उपोषणादरम्यान सरकारची मोठी कारवाई, बड्या अधिकाऱ्याचं निलंबन

SCROLL FOR NEXT