Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: बेपत्ता असलेल्‍या नगर परिषदेचे गुत्तेदाराचा जलाशयात आढळला मृतदेह

बेपत्ता असलेल्‍या नगर परिषदेचे गुत्तेदाराचा जलाशयात आढळला मृतदेह

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालना शहरातील नगर परिषदेचे मुख्य गुत्तेदार एम. पी. पवार यांच्या मृत्यदेह घाणेवाडी जलाशयात आढळून आला. यामुळे (Jalna News) शहरात एकच खळबळ उडाली आहे. गुत्‍तेदार हे कालपासून गायब असल्याने त्यांचा शोध सुरू असताना आज त्यांची दुचाकी घानेवाडी जलाशय जवळ आढळून आल्या नंतर त्यांचा मृत्यदेह ही जलाशयात तरंगताना आढळून आला. (Breaking Marathi News)

एम. पी. पवार हे जालना नगर परिषदेतील प्रमुख गुत्तेदार असून ते मंगळवारपासून बेपत्ता असल्याने त्यांचा शोध सुरू होता. याच दरम्‍यान त्यांचा मृत्यूदेह घाणेवाडी जलाशयात आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून जलाशयाजवल त्यांची दुचाकी आढळून आली असून तिला एक बॉटल असलेली बॅग लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचले. अग्निशमन विभागाच्या मदतीने मृत्यदेह जलाशयाच्या बाहेर काढला असून शेविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

यापूर्वीही एका नगर परिषदेच्या गुत्‍तेदारांना विषारी द्रव्य पिऊन सोशल मीडियावर नगर परिषदकडून बिल मिळत नसल्याने आत्महत्या करण्याचा प्रयन्त केला होता. त्यानंतर ही घटना घडल्याने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिलेदारांनी वाढवल्या शिंदेंच्या अडचणी?आपल्याच नेत्यांमुळे शिंदे चक्रव्युहात? खोतकर, शिरसाटांसह गायकवाडही अडचणीत

Maharashtra Live News Update : पुण्यातील यशवंत नाट्यगृहात वंचित बहुजन आघाडीचा राडा

Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघात; भरधाव कार तीन-चार वेळा उलटली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : शिंदेच्या शिवसेनेला मोठा हादरा! नाराज पदाधिकाऱ्यांसह हजारो कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

Pimples On Face: चेहऱ्यावर पिंपल्स येताहेत? ही चूक ठरतेय कारणीभूत, आजच सोडा 'या' वाईट सवयी

SCROLL FOR NEXT