Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News : ठेवीदारांचा रास्ता रोको; ज्ञानराधा पतसंस्थेतील ठेवी परत देण्याची मागणी

Jalna News : अंबड शहरातील ज्ञानराधा पतसंस्थेत अनेक ठेवीदारांनी त्यांची आयुष्याची जमापुंजी ठेवली होती. मात्र ही पथसंस्था अचानक बंद पडली आणि ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवीच्या रक्कम बुडाली.

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालना जिल्ह्यातल्या अंबड शहरात आज ज्ञानराधा पतसंस्थेच्या ठेवीदारांनी अचानक रास्ता रोको आंदोलन (Jalna) केलं. मागील अनेक दिवसांपासून पतसंस्थेचे ठेवीदार पैसे परत मिळावे यासाठी उपोषणाला बसले होते. मात्र आज अचानक या उपोषणकर्त्या ठेवीदारांनी रास्ता रोको करत पैसे परत मिळण्याची मागणी केली. (Live Marathi News)

अंबड (Ambad) शहरातील ज्ञानराधा पतसंस्थेत अनेक ठेवीदारांनी त्यांची आयुष्याची जमापुंजी ठेवली होती. मात्र ही पथसंस्था अचानक बंद पडली आणि ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवीच्या रक्कम बुडाली. आम्ही कष्ट करून जमा केलेली रक्कम आम्हाला परत मिळावी; यासाठी ठेवीदारांनी आंदोलन पुकारले आहे. मागील काही दिवसांपासून ठेवीदार उपोषणाला बसले आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तर जेलभरो आंदोलन 

दरम्यान आज उपोषणकर्ते ठेवीदार आक्रमक झाले असून त्यांनी अचानक (Rasta Roko) रास्ता रोको आंदोलन केले. अंबड- जालना महामार्गावर केलेल्या या रास्ता रोकोमुळे वाहतूक विस्कळीत होऊन महामार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. अंबड तहसीलदार यांच्या मध्यास्तीने हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र आमचे पैसे आम्हाला परत मिळाले नाही, तर आम्ही जेलभरो आंदोलन करू असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Workout Tips: सकाळी व्यायाम करायच्या आधी काय खावे?

Fact Check : कपड्यांच्या शोरूममध्ये भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Shocking : ऑनलाइन डेटा चोरी, महिलेचे नग्नावस्थेतील फोटो, व्हिडीओ व्हायरल; कंपनीवर खटला दाखल

Shani Shingnapur : अभिषेक आता फक्त १०० रूपयांत येणार; शनिशंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळाचा निर्णय, VIDEO

IPS अंजना कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या सरकारी अधिकाऱ्याला मारहाण; माढ्यातील कुर्डू गावात गुंडगिरी| Video

SCROLL FOR NEXT