Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna : बंजारा समाजाच्या मागणीला आदिवासी समाजाचा विरोध; जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Jalna News : मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियर नुसार कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्यानुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्याची मागणी जोर धरू लागली आहे

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यानंतर राज्यात बंजारा समाज देखील आक्रमक झाला असून या गॅझेटनुसार समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र आता आदिवासी समाज या विरोधात उभा झाला असून बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण न देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. 

राज्यातून बंजारा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. तर बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये; या मागणीसाठी आज जालन्यात आदिवासी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. जालना शहरातील अंबड चौफुली परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली असून हा मोर्चा जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे; या मागणीसाठी राज्यांमध्ये विविध ठिकाणी बंजारा समाजाचे आंदोलन सुरू आहे. 

आमदारांचाही निषेध 

बंजारा समाजाच्या मागणीला विरोध करत आज जालन्यात देखील आदिवासी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला आहे. दरम्यान ज्या आमदारांनी बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी पाठिंबा दिला आहे; त्यांचा देखील निषेध यावेळी आदिवासी बांधवांनी नोंदविला आहे. यामुळे आरक्षणाच्या या मुद्द्यावरून बंजारा समाजाच्या मागणी विरोधात आंदोलन पुकारण्यात आल्याचे पाहण्यास मिळाले आहे.  

आरक्षणासाठी आमदार धनंजय मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गातील समावेशाच्या मागणीसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी पाठिंबा दिला. याबाबतचे पत्र आमदार धनंजय मुंडे यांनी फडणवीस यांना पाठवले असून यामध्ये मराठवाड्यातील बंजारा समाजाला हैदराबाद स्टेट नुसार जमाती प्रवर्ग आरक्षणाचा दर्जा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: कोचकडून महिला खेळाडूवर बलात्कार, हॉटेलवर सरावासाठी बोलावलं अन्...; करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी

'V' Neck ब्लाउजची क्रेझ; साडीला देईल रॉयल लूक, पाहा ट्रेंडी डिझाइन्स

Maharashtra Live News Update: हिंगोलीच्या औंढा शहरात गटविकास अधिकाऱ्याची गाढवावरून प्रतिकात्मक धिंड

Viral Video : एकमेकींचे केस ओढले, रस्त्यात राडा घातला; प्रचाराचे पैसे न मिळाल्याने महिलांची फ्री स्टाईल हाणामारी

Navi Mumbai : नवी मुंबईच्या लॉजमध्ये नको ते उद्योग, पोलिसांनी उद्ध्वस्त केले देहविक्रीचं रॅकेट; ७ महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT