Bus Accident Saam tv
महाराष्ट्र

Bus Accident : अंबड बसस्थानकात घडले थरारक; बसचे ब्रेक फेल होऊन थेट घुसली प्लॅटफॉर्मवर, दोन प्रवाशांचा मृत्यू

Jalna News : एसटीमधून प्रवास करणाऱ्यांना सवलत मिळत असल्याने बहुतांश प्रवासी हे बसची प्रतीक्षा करत थांबलेले असतात. त्यानुसार अंबड बसस्थानकावर दुपारी प्रवाशांची गर्दी असताना हा अपघात घडला आहे

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 

जालना : राज्य परिवहन महामंडळाच्या अंबड बसस्थानकावर आज दुपारच्या सुमारास बस अपघाताचा थरार घडला आहे. चालकाने बस चालू करताच बस थेट प्लॅटफॉर्मवर घुसली. यामुळे बसस्थानकात बसच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहे. या बस अपघातामुळे बसस्थानकात प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता. 

राज्य परिवहन महामंडळाच्या जालना विभागातील अंबड येथील बस स्थानकावर सदरची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. बसस्थानकावर प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. एसटीमधून प्रवास करणाऱ्यांना सवलत मिळत असल्याने बहुतांश प्रवासी हे बसची प्रतीक्षा करत थांबलेले असतात. त्यानुसार अंबड बसस्थानकावर दुपारी प्रवाशांची गर्दी असताना हा अपघात घडला आहे. अंगावर थरकाप उडविणारा अपघात काही क्षणात घडल्याने धावपळ उडाली होती. 

चालकाचे सुटले नियंत्रण 

दरम्यान दुपारी जालना जिल्ह्यातील अंबड येथील बसस्थानकावरती बस चालकाने बस मार्गस्थ करण्यासाठी चालू केली. यानंतर पुढे नेण्यासाठी गिअर टाकताच बस पुढे गेली. बसचे ब्रेक फेल असल्यामुळे चालकाने ब्रेक दाबूनही बस थांबली नाही. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून बस थेट प्लॅटफॉर्मध्ये जाऊन थांबली. या अपघातामध्ये बसच्या प्रतीक्षेत असलेले दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. मयतामध्ये शेवगा येथील मुरलीधर काळे (वय ६५) यांचा समावेश आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. 

बसस्थानकात उडाला गोंधळ 
दरम्यान अचानक घडलेल्या या अपघातामुळे बसस्थानकात गोंधळ उडाला होता. यानंतर महामंडळाचे कारभारी धावून आले. या कर्मचाऱ्यांनी घटनेतील जखमींना लागलीच जालना जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. तर या प्रकरणी अंबड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: हुशार लोक या 6 ठिकाणी धाडस दाखवत नाहीत; खड्ड्यात पडण्यापासून व्हा सावध, वाचा चाणक्यांचा सल्ला

Viral Video: लिफ्टमध्ये अडकली होती २ मुलं, धाडस दाखवत मुलीने वाचवले प्राण, व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

Maharashtra Live News Update: अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी मोठी अपडेट

Upit Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी उपीट, वाचा सोपी रेसिपी

How to Keep Kobi Fresh: कोबी आठवडाभर राहील ताजी, वापरा फक्त ही १ ट्रीक

SCROLL FOR NEXT