jalna News 30-year-old youth ended his life to demand Maratha reservation Saam TV
महाराष्ट्र

Jalna News: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 वर्षीय तरुणाची विहिरीत उडी; दोन मुलं झाली पोरकी

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

Jalna Maratha Aarakshan News

जालना जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एका ३० वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. सोमवारी (३० ऑक्टोबर) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. स्वपान बाबुराव कचरे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, स्वपान हा जालना तालुक्यातील (Jalna News) कचरेवाडी येथील रहिवासी होता. गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तो आंदोलन करीत होता. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्याने स्वपान अस्वस्थ झाला होता.

मराठ्यांना आरक्षण (Maratha Aarakshan) मिळालं नाही, तर मी माझं जीवन संपवणार, असं स्वपान आपल्या काकांना सांगत होता. दरम्यान, आरक्षणाची मागणी करुन देखील सरकारकडून कोणतीही ठोस पाऊलं उचलली जात नसल्याने स्वपानला नैराश्य आलं.

याच नैराश्यातून त्याने टोकाची भूमिका घेत शेतातील विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. स्वपानने आत्महत्या केल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. घटनेची माहिती मिळताच मराठा बांधवांसह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (Latest Marathi News)

पोलिसांनी (Police) स्वपानचा मृतदेह विहिरीबाहेर काढून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. स्वपान हा विवाहित असून त्याला एक सहा वर्षाची मुलगी आणि एक चार वर्षाचा मुलगा आहे. मुलांच्या भवितव्यासाठीच स्वपानने हे टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा आहे.

Edited by - Satish Daud Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT