Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: २८ क्विंटल तांदूळ जप्त; हैद्राबादला काळ्या बाजारात विक्रीसाठी तयारी

Jalna News: २८ क्विंटल तांदूळ जप्त; हैद्राबादला काळ्या बाजारात विक्रीसाठी तयारी

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : भोकरदन तालुक्यातील हसनाबादहुन हैद्राबादकडे काळया बाजारात विक्रीसाठी जाणारा तांदूळ (Jalna) जप्त करण्यात आला आहे.  स्थानिक गुन्हे शाखा आणि हसनाबाद पोलिसांनी (Police) ट्रकचा पाठलाग करुन ट्रक जप्त केला आहे. (Latest Marathi News)

हसनाबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हसनाबाद फाट्यावर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत २८ क्विंटल तांदूळ जप्त करण्यात आला असून याची किंमत १ लाख रूपये इतकी आहे.  एका ट्रकमधून २८ क्विंटल तांदूळ विक्रीसाठी हैद्राबादकडे जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. दरम्यान पोलिसांनी तांदूळ जप्त केला असून ट्रकही ताब्यात घेतला आहे. 

या कारवाईत एकूण १ लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी महसूल विभागाला पत्र पाठवून तांदूळ कुठल्या दुकानात पुरवठा केल्या जात होता. याबाबत अधिक चौकशी करत असून महसूल विभागाकडून ही पथक पाठवून तांदुळाचे नमुने घेण्यात आले आहेत. पोलिसांनी चालकासह एकाला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदारांची बैठक सुरू, काय निर्णय होणार?

Surupsingh Naik Passes Away: आदिवासी युवकांचा आधारस्तंभ हरपला; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे निधन

अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारणी, नगराध्यक्ष ते आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या; ऐन निवडणुकीत राज्य सरकारचे ४ महत्वाचे निर्णय

Urfi Javed: रात्री ३ वाजता दोन पुरुषांनी दार ठोठावलं अन्...; उर्फी जावेदसोबत नेमकं काय घडलं?

Heart health new year resolutions: नव्या वर्षात हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवायचंय? हे ५ संकल्प नक्की करा

SCROLL FOR NEXT