Jalna Panchayat Election Results लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

Nagar Panchayat Election Results: जालन्यात टोपे, कुचे यांचं वर्चस्व कायम, 5 नगरपंचायत निवडणूकीचा निकाल जाहीर

जालन्यातील लक्षवेधी असलेल्या घनसावंगी, तिर्थपुरी नगर पंचायतीवर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना - जिल्ह्यातील 5 नगर पंचायत निवडणूकीचा निकाल जाहीर झाला आहे.जालन्यातील लक्षवेधी असलेल्या घनसावंगी, तिर्थपुरी नगर पंचायतीवर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. घनसावंगी नगरपंचायतीत राष्ट्रवादीला 10 तर तिर्थपुरी नगर पंचायतीत 11 जागा मिळाल्या आहे. जाफ्राबाद नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसला (Congress) प्रत्येकी 6 जागेवर विजय मिळाला असून अपक्षांना 4 तर भाजपला केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे.

हे देखील पहा -

मंठा नगर पंचायत निवडणुकीत शिवसेनेचे वर्चस्व निर्माण झालंअसून शिवसेनेचे12 उमेदवार निवडून आले आहेत. तर भाजपचे केवळ 2 उमेदवार विजयी झाले आहे. मंठा नगर पंचायत निवडणुकीत भाजपचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांना धक्का बसला आहे. मंठा नगर पंचायत पुन्हा शिवसेनेच्या ताब्यात गेली आहे.तर बदनापूर नगर पंचायत निवडणुकीत भाजपने पुन्हा वर्चस्व सिद्ध केलं आहे.

या निवडणुकीत भाजपने 9 तर राष्ट्रवादीने 5 जागांवर विजय मिळवला आहे. बदनापूर नगर पंचायतीवर भाजप आमदार नारायण कुचे यांनी वर्चस्व मिळवलं असून शिवसेनेला एकही जागा या नगर पंचायतीत मिळाली नाही.त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार संतोष सांबरे यांना हा मोठा धक्का समजला जात आहे.

पक्षनिहाय विजयी झालेले उमेदवार

जालना - घनसावंगी

भाजप 0

शिवसेना 6

राष्ट्रवादी 10

काँग्रेस 0

ईतर 0

जालना - मंठा

भाजप 2

शिवसेना 12

राष्ट्रवादी 1

काँग्रेस 2

ईतर 0

जालना -जाफ्राबाद

भाजप 1

शिवसेना 0

राष्ट्रवादी 6

काँग्रेस 6

ईतर 4

जालना - तिर्थपुरी

भाजप-2

शिवसेना-3

राष्ट्रवादी-11

काँग्रेस-1

ईतर-0

जालना - बदनापूर

भाजप-9

शिवसेना -0

राष्ट्रवादी-5

काँग्रेस-1

ईतर-2ं

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: बापरे! खोल विहिरीत महिलांनी घेतला झोका; VIDEO व्हायरल होताच नेटकरी झाले हैराण

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अचलपुरात बच्चू कडूंना मोठा धक्का; भाजपचे प्रवीण तायडे विजयी

Health Diet: तुमच्या रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असणे महत्वाचे आहे? जाणून घ्या फायदे

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

SCROLL FOR NEXT