मराठवाड्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, आजपासून जालना ते मुंबई या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार आहे. 'वंदे भारत'मुळे प्रवाशांची मोठी सोय होणार असून, प्रवास अधिक गतिमान होणार आहे. दरम्यान, जालना येथून एक्स्प्रेस सुटण्याची वेळ किती, ट्रेन कोणकोणत्या थांब्यावर थांबणार, तिकीट दर किती असणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सध्या जालना येथून मुंबईला जाण्यासाठी सीएसएमटी-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस ही वेगवान गाडी आहे. मात्र, नव्या वर्षात या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सर्वांत वेगवान गाडी ठरणार आहे. मुंबई-जालना रेल्वे अंतर वंदे भारत ५ तास २० मिनिटांत पार करणार आहे. जनशताब्दीला हे अंतर पार करण्यासाठी ७ तास ४५ मिनिटे लागतात.
जालना-मुंबई वंदे भारत विशेष ट्रेनला एकूण ८ डबे देण्यात आले आहेत. ही ट्रेन दररोज सकाळी जालना रेल्वे स्थानकातून ५.०५ मिनिटांनी ही गाडी सुटेल, ५.५३ ला छत्रपती संभाजीनगर, नाशिकमध्ये सकाळी ८.३८ ला ही ट्रेन पोहोचेल.
तर, ठाणे स्थानकात ११. १० वाजता तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे ही एक्स्प्रेस ११.५५ ला पोहोचेल. प्रत्येक स्थानकावर ही एक्स्प्रेस २ मिनिटं थांबेल. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून जालन्याकडे सुटण्यासाठी ट्रेनची वेळ दुपारी १.१० वाजताची ठेवण्यात आली आहे.
CSMT वरून ही ट्रेन ठाण्यात १ वाजून ४० मिनिटांना पोहोचेल. नाशिकमध्ये सायंकाळी ४.२८ वाजता एक्स्प्रेस पोहोचेल. छत्रपती संभाजीनगरला ७.०८ ला तर जालन्यात रात्री ८.३० वाजता ही ट्रेन पोहोचेल. दरम्यान, या ट्रेनसाठी तिकीटाचे दर ९०० ते १०० च्या आसपास असण्याची शक्यता आहे. लवकरच रेल्वेकडून याबाबत माहिती दिली जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.