Manoj Jarange Patil Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: ...तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, मराठा आरक्षणासाठी ट्रॅक्टर मोर्चा काढणाऱ्यांशी मनोज जरांगेंचा संवाद

Jalna Tractor Morcha: आंदोलकांशी मनोज जरांगे यांनी फोनवरून संवाद साधला आहे.

Ruchika Jadhav

Jalna Maratha Protest:

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाचे आंदोलन अद्याप सुरूच आहे. जालन्यात आज मराठा आंदोलकांकडून तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. या आंदोलकांशी मनोज जरांगे पाटील यांनी फोनवरून संवाद साधला आहे. तसेच आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असं जरांगे पाटलांंनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

"तुमची ताकद वाया जाऊ देणार नाही. तुम्हाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हा मनोज जरांगे स्वस्थ बसणार नाही, फक्त मोर्चे शांततेत काढा.", असं आवाहन करत मनोज जरांगेंनी ट्रॅक्टर मोर्चा काढणाऱ्या आंदोलकांशी फोनवरून संवाद साधला आहे.

जालन्यातील केदारखेडा येथील ग्रामस्थांनी आज केदारखेडा ते भोकरदन तहसिल कार्यालय असा 600 ट्रॅक्टरांचा मोर्चा काढला. यावेळी जरांगे यांनी या आंदोलनकर्त्यांशी फोनवरून संवाद साधला. तसेच मोर्चे शांततेत काढा असं आवाहन केलं.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जलन्यातील अंतरावाली सराटी गावात आमरण उपोषण केले होते. तब्बल १७ दिवस मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. मात्र मराठा समाजाचं आंदोलन सुरूच राहणार असं त्यांनी म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: INDIA आघाडीच्या नेत्यांचा रामलीला मैदानाकडे मोर्चा

Dengue Awareness : उत्तम फिटनेस असलेल्या लोकांनाही डेंग्यूचा धोका का असतो? जाणून घ्या लक्षणे आणि बचावाचे सोपे उपाय

Death News: हनी सिंगच्या पुतण्याचा भीषण अपघातात मृत्यू; वाढदिवसाच्या पार्टीहून परतताना काळाचा घाला

Political News: मोठी बातमी! २ आमदारांचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

Rahul Gandhi : निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत इंडिया आघाडीचा 'महामोर्चा', नजर फिरेल तिथपर्यंत आंदोलक, पाहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT