Jalna Mother and Son Drowned Saam Tv
महाराष्ट्र

Jalna News: होळीच्या दिवशीच गावावर शोककळा, मायलेकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

Jalna Mother and Son Drowned: जाळण्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. शेततळ्यात बुडून मायलेकाचा झाल्याची घटना कडवंची येथे घडलीय.

लक्ष्मण सोळुंके

Jalna News:

जाळण्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. शेततळ्यात बुडून मायलेकाचा झाल्याची घटना कडवंची येथे घडलीय. समाधान मानिक वानखेडे वय 23 वर्ष आणि सुमित्रा मानिक वानखेडे वय 40 वर्ष अशी मयत दोघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, समाधान आणि त्याची आई सुमित्रा दोघे ही सकाळच्या सुमारास त्यांच्या शेतात गेले होते. मात्र दुपार झाली तरी हे दोघे अजून परत कसे आले नाहीत, म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते कुठेच मिळाले नाही. दरम्यान काही वेळानंतर त्यांच्या नातेवाईकांना शेत तळ्यात काही तरी तरांगतांना दिसले. त्यावरून नातेवाईकांनी त्यात शोध घेतला असता दोघांचे मृतदेह त्यात आढलून आले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ही घटना कळताच मृतांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केलाय. नातेवाईकांनी दोघांचे मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात तपासणीसाठी आणले असता उपस्थित डॉक्टरांनी त्या दोघांना तपासून मृत घोषित केलं. दरम्यान दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.  (Latest Marathi News)

नाशिकमध्ये शेततळ्यात पडून दोन सख्या भावांचा मृत्यू

दरम्यान, बुधवारी नाशिकच्या देवळा तालुक्यातील बुटेश्वर शिवारात शेततळ्यात बुडून दोन सख्या भावांचा यात मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरलीय. तेजस आणि मानव गणेश आहेर, अशी या दोन्ही मुलांची नाव आहेत. दुपारच्या सुमारास शाळेतून घरी परत आल्यावर घरातील सर्व जण कांदा काढणीच्या कामात व्यस्त असतांना दोन्ही भावंड शेतात गेली. मात्र जवळच्या डोंगरावरुन काही वानरांची टोळी शेतात आली. त्यांना हुसकावण्याच्या नादात दोन्ही भाऊ त्यांच्या मागे धावले.

यानंतर डोंगर उतारावर असलेल्या एका शेततळ्यात असलेले पाणी पाहायला गेले असता मोठा भाऊ तेजस याचा पाय घसरल्याने लहान भाऊ मानव याने त्याला वाचविण्यासाठी हात दिला. यात तोही तळ्यात घसरला. यातच दोघांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणात जलवाहिनी फुटल्याने वाहतुकीचा रस्ता बंद

Shoes And Socks Benefits: बुटांमध्ये सॉक्स का घालतात? कारण काय?

वरळीत ठाकरेसेना–भाजपमध्ये जोरदार राडा; शिवसैनिकांकडून फलकाची तोडफोड|VIDEO

Shocking: हृदयद्रावक! केळी खाताना घशात अडकली, ५ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; आईच्या कुशीत सोडले प्राण

Woolen Cloth : हिवाळ्यात सतत लोकरीचे कपडे घालून मळले? स्वेटर धुवताना फॉलो करा 'ही' खास ट्रिक

SCROLL FOR NEXT