महाराष्ट्र

Government Hospital: गर्भवती महिलेच्या डॉपलर टेस्टसाठी जेलीऐवजी वापरलं फिनाईल; सरकारी रुग्णालयातील संतापजनक प्रकार

Jalna Hospital Incident: भोकरदन च्या ग्रामीण रुग्णालयामध्ये एका डॉक्टरने डॉलरटेस्टसाठी जेलीऐवजी फिनाईलचा वापर केलाय. यामुळे एका गर्भवती महिलेला इन्फेक्शन झालंय.

Bharat Jadhav

अक्षय शिंदे, साम प्रतिनिधी

जालना जिल्ह्यातील भोकरदनच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये एक संतापजनक प्रकार घडल्याचं समोर आले आहे. रुग्णालायातील डॉक्टरने अघोरी उपचार केल्याची घटना घडलीय. अघोरी असं की, डॉक्टरने प्रसुतीसाठी आलेल्या महिलेचा उपचार फिनाइलने केलाय. गर्भवती महिलेच्या डॉपलर टेस्टसाठी डॉक्टरनं जेलीऐवजी फिनाईलचा वापर केला. यामुळे गर्भवती महिलेच्या पोटाची कातडी जळून इन्फेक्शन झाले आहे. याप्रकरणी डॉक्टर आणि नर्सवर कारवाई केली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भोकरदन तालुक्यातील खापरखेडा वाडी गावातील एक गरोदर महिला प्रसुतीसाठी दाखल झाली होती. सोनोग्राफी सेंटरमध्ये महिलेच्या तपासणीदरम्यान डॉपलर टेस्टदरम्यान संबंधित डॉक्टरांना जेली म्हणून चक्क या महिलेच्या पोटाला फिनाइल लावलं. त्यामुळे महिलेच्या पोटावरील त्वचा होरपळलीय. दरम्यान याप्रकरणी संबंधित डॉक्टर किंवा नर्सची चौकशी केली जाणार असल्याची माहिती जालना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी दिली आहे.

सफाई कामगारच बनला डॉक्टर, मनपा रुग्णालयातील प्रकार

मुंबई महापालिकेच्या चेंबूर मधील पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयातील हा प्रकार आहे. येथील एक सफाई कामगारच रुग्गांचे ECG करत होता. समाजवादी पार्टीच्या मुंबई अध्यक्ष आणि माजी नगरसेविका रुकसाना सिद्धी यांनी हा प्रकार समोर आणला होता. शताब्दी रुग्णालयात रोज हजारोच्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात.परंतु या ठिकाणी रुग्णांना तपासण्यासाठी डॉक्टरांची आणि कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.

गेल्या अनेक वर्षापासून कर्मचारी भरती न झाल्याने रुग्णांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागताहेत. दरम्यान याप्रकरणी रुकसाना सिद्दिकी यांनी रुग्णालयाचे अधिकारी सुनील पखाले यांना जाब विचारला होता. डॉक्टर कर्मचारी यांची कमतरता असल्यानं सफाई कर्मचाऱ्यांना याचे प्रशिक्षण दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT