Jalna: दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणीवर सामूहिक बलात्कार, 4 जण अटकेत  लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

Jalna: दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणीवर सामूहिक बलात्कार, 4 जण अटकेत

मुंबईतील अल्पवयीन सख्ख्या दोन बहिणीवर नोकरीचे अमिष दाखवून, चौघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना

लक्ष्मण सोळुंके

जालना : मुंबईतील अल्पवयीन सख्ख्या दोन बहिणीवर नोकरीचे अमिष दाखवून, चौघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना जालना शहरात घडली आहे. पीडित बहिणींनी या नराधमाच्या तावडीतून सुटका करून औरंगाबाद गाठत सिडको पोलिस ठाणे गाठले आहे. नंतर हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मुंबईतील दिघा परिसरात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना जालन्यात नोकरी लावून देतो म्हणून जालना तालुक्यातील निधोना गावच्या अविनाश जोगदंड हा १८ वर्षीय तरुण त्यांना ३ सप्टेंबर दिवशी जालना शहरात घेऊन आला. जालना शरातील एका भागात त्याने भाड्याची रुम घेऊन दोन बहिणीची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

हे देखील पहा-

त्यानंतर आरोपी अविनाश आणि त्याचा भाऊ शुभम जोगदंड, दीपक राणा आणि गणेश काकडे या चौघांनी महिनाभर या दोघींना रुममध्ये डांबून या अल्पवयीन बहिणीवर लेंगिक अत्याचार करत होते. या दोघीना १ ऑक्टोबर दिवशी चौघांच्या तावडीतून सुटका करून घेत औरंगाबाद गाठले आहे. या ठिकाणी येऊन सिडको पोलिसांना घडलेला सर्व गैरप्रकार सांगितला आहे.

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत संपूर्ण चौकशी करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत हा गुन्हा कदीम जालना पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. कदीम जालना पोलसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत रात्रभर कोंबिंग ऑपरेशनद्वारे या प्रकरणातील ३ आरोपींना शहरातील वेगवेगळ्या भागातून अटक करण्यात आली आहे.

नंतर मुख्य आरोपी अविनाश जोगदंड हा नांदेडहुन जालन्याकडे रेल्वेने येत असल्याची माहिती मिळताच रेल्वे स्थानकावर सापळा रचून रात्री २ वाजेच्या सुमारास त्याला देखील अटक करण्यात आली आहे. शहरात घडलेल्या या लेंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

Accident: लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १०० जणांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला कंटेनरची धडक; ४ जणांचा मृत्यू

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? ठाकरेंचे ६ खासदार फुटणार? हिंगोलीतील खासदार एकनाथ शिंदेंच्या भेटीला

SCROLL FOR NEXT