Jalna News Saam Tv
महाराष्ट्र

Jalna Crime: धक्कादायक! डुकरांच्या वाटणीवरुन तीन अज्ञातांनी केला तरुणावर गोळीबार

या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना - बुलेटवरून आलेल्या 3 अज्ञातांनी गावठी पिस्तूलातून तरुणावर गोळीबार केला आहे. या गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. जीवन जाधव असं गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. जालना (jalna) जिल्ह्यातील परतुर (Partur)तालुक्यातील हातडी येथे आज सकाळी ही घटना घडली आहे. डुकराच्या वाटणीवरून गोळीबार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

हे देखील पाहा -

परतुर तालुक्यातील हातडी येथे घनसावंगी तालुक्यातील कंडारी परतुर येथील जीवन जाधव नावाच्या व्यक्तीने पाळलेली डुकरे सोडलेली आहेत.आज सकाळी जीवन जाधव हा डुकरांची देखभाल करण्यासाठी हातडीत आला होता. यावेळी बुलेटवरून आलेल्या अज्ञात 3 इसमांनी त्याच्यावर गावठी पिस्तूलातून गोळ्या झाडल्या.

या घटनेत जीवन जाधव याच्या डोक्यावर गोळ्या लागल्याने गंभीर जखमी असून, पोलिसांनी तातडीने त्याला उपचारासाठी जालना येथे हलविले आहे. या घटनेनंतर परतुर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून जखमींना मदतकार्य केलं. बुलेटवरून आलेले हल्लेखोर हे तिघेजण असून, ते गोळ्या झाडून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उपराजधानी नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची संततधार

Free Mobile Scheme: केंद्र सरकार देणार मोफत स्मार्टफोन? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Wednesday Horoscope : बाहेरचे पाणी आणि खाण्यापासून राहा सावध, अन्यथा...; 'या' राशीच्या लोकांना घ्यावी लागेल आरोग्याची काळजी

Bharat Bandh: भारत बंददरम्यान काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार?

Crime News : तुला घरी नेण्यासाठी कुणी आलं नाही का? पाचवीतल्या चिमुकलीसोबत शिक्षकाचं किळसवाणं कृत्य, रत्नागिरीत खळबळ

SCROLL FOR NEXT