Jalna Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalna Crime : सराफा दुकानात केला हात साफ; २० लाखांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास

Jalna News : चोरट्यांनी जवळपास २० लाखांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले आहे. चार ते पाच आज्ञात चोरट्यांनी शटरचे लॉक तोडून जवळपास 20 लाखांचा ऐवज घेऊन पसार झाल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: रात्रीच्या सुमारास चोरटयांनी सराफ दुकानात जाऊन हात साफ केल्याची घटना जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील कुंभारी पिंपळगाव येथे घडली आहे. सराफ दुकानातून चोरट्यांनी साधारण २० लाख रुपये किंमतीचे सोने- चांदीचे दागिने लांबविल्याचे उघडकीस आले. हि चोरीची संपूर्ण घटना दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. 

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात असलेल्या कुंभारी पिंपळगाव येथील सराफ दुकानात रात्रीच्या सुमारास चोरीची घटना घडली आहे. सराफा दुकानात चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत चोरी केली आहे. या चोरट्यांनी जवळपास २० लाखांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले आहे. चार ते पाच आज्ञात चोरट्यांनी शटरचे लॉक तोडून जवळपास 20 लाखांचा ऐवज घेऊन पसार झाल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. 

पोलिसांकडून तपास सुरु 

दरम्यान कुंभारी पिंपळगाव येथे सराफा दुकानात झालेल्या या चोरीमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज घेतले असून चोरट्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे. 

सराफ दुकान फोडणारे आरोपी जेरबंद

श्रीरामपूर (अहिल्यानगर) : श्रीरामपूर येथील सराफ दुकान फोडण्यात आले होते. चोरट्यांनी १७ जुलैला सराफ दुकानाचे शटर तोडून लाखोंचा ऐवज लुटला होता. सराफ दुकान फोडणाऱ्या चार आरोपींना अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जालना येथून जेरबंद केले आहार. आरोपींकडून ११ किलो चांदीसह १४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: वंचित बहुजन आघाडीकडून भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

Lose Belly Fat : महागड्या डाएटशिवायही पोटावरील चरबी झपाट्याने होईल कमी, फक्त आठवडाभर करा 'हा' घरगुती उपाय

Abhijit Dipke Exclusive: भर मुलाखतीत अभिजीत दिपकेला अश्रू अनावर; म्हणाला, अमेरिकेत असताना ती एक गोष्ट मनाला खूप लागली

Rain Alert : भीमा-नीरा खोऱ्यात मुसळधार पाऊस; उजनी, वीर धरणांतून मोठा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

EPFO Update : PF धारकांसाठी मोठी खुशखबर! आता पीएफचे पैसे अवघ्या 2 दिवसांत खात्यात, UPI द्वारेही मिळणार रक्कम

SCROLL FOR NEXT