Nashik : १०८ ऍब्युलन्सच्या महिला डॉक्टरला मारहाण; भद्राकाली पोलिसात गुन्हा दाखल

Nashik News : शिवीगाळ व दमबाजी करून अंगावर धावून गेला. इतकेच नाही तर कानशिलात चापट मारली. तसेच ‘तुला जेवढे बोललो तेवढे कर, तुला कोणाला सांगायचे ते सांग...’ असे बोलून धमकावल्याचा आरोपही फिर्यादीत आहे
Nashik News
Nashik NewsSaam tv
Published On

तबरेज शेख 
नाशिक
: द्वारका परिसरातून जुने नाशिकमधील बागवानपुऱ्यात जाणाऱ्या रस्त्यावर अनोळखी रूग्णाला रेस्क्यूसाठी पोहचलेल्या १०८ च्या महिला डॉक्टरसोबत शाब्दिक वाद घालून या डॉक्टरच्या कानशिलात मारल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे रामसिंग बावरी यांच्याविरूद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. 

नाशिकच्या द्वारका परिसरात बुधवारी सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास बावरी यांनी १०८ या आपत्कालीन हेल्पलाइनवर संपर्क साधून मदत मागितली होती. यानुसार मोरवाडी अंबड येथील लोकेशनवरील रूग्णवाहिकेवर इमर्जन्सी डॉक्टर म्हणून चालक सागर कदम यांच्यासोबत डॉक्टर खतीब घटनास्थळ गाठले. याठिकाणी पोहचल्यावर बावरी यांनी त्यांच्याशी शाब्दिक वाद घालत शिवीगाळ व दमबाजी करून त्यांच्या अंगावर धावून गेला. इतकेच नाही तर उजव्या कानशिलात हाताची चापट मारली, असे फिर्यादीत म्हटले आहे. ‘तुला जेवढे बोललो तेवढे कर, तुला कोणाला सांगायचे ते सांग...’ असे बोलून धमकावल्याचा आरोपही त्यांनी फिर्यादीत केला आहे.

Nashik News
Wasmat Bajar Samiti : हळद विक्रीचे दोन महिने उलटूनही पैसे मिळेना; शेतकऱ्यांचे पैसे मिळत नसल्याने बाजार समिती बंद

रुग्णवाहिका चालक, डॉक्टरांचे कामबंद 
दरम्यान घटनेचे पडसाद उमटले असून शहरातील पाचही रूग्णवाहिका चालक- डॉक्टर यांनी तातडीने रूग्णवाहिकांसह भद्रकाली पोलिस ठाण्यात धाव घेत काम बंद आंदोलन पुकारले. जोपर्यंत गुन्हा दाखल केला जात नाही; तोपर्यंत काम सुरू करणार नाही, असा पवित्रा घेतला. १०८ हेल्पलाइनचे व्यवस्थापकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात येऊन समजूत काढल्यानंतर सुमारे दोन ते तीन तासानंतर रूग्णवाहिका येथून त्यांच्या निश्चित लोकेशनकडे रवाना झाल्या. तोपर्यंत आपत्कालीन रूग्णसेवा ठप्प झालेली होती.

Nashik News
Rasta Roko : शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहार संघटना आक्रमक; राज्यात ठिकठिकाणी केला चक्काजाम, शेतकरीही उतरले रस्त्यावर

पोलिसात गुन्हा दाखल 

दरम्यान या घडल्या प्रकारानंतर शासकिय लोकसेवकाला कर्तव्यापासून रोखण्याकरिता प्राणघातक हल्ला करणे, चिथावणीखोर वक्तव्य करत अनादर करणे, सरकारी कर्मचाऱ्याला दुखापत करणे, सार्वजनिक शांतता भंग करण्यासाठी चिथावणी देणे, गुन्हेगारी स्वरूपाची धमकी देणे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात गंभीर स्वरूपाची शिक्षा व दंडाची तरतूद आहे. फिर्यादी डॉ. नाहील खतीब यांनी बावरी यांच्याविरूद्ध तक्रार दिल्याची माहिती भद्रकाली पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com