Jalna Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalna Crime : जालना हादरलं; आईच्या प्रियकराकडून दोन चिमुकल्यांवर अत्याचार; नराधम पोलिसांच्या ताब्यात

Jalna News : मागील दोन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये जुना जालना भागात राहत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यांच्यासोबत महिलेच्या दोन मुली देखील वास्तव्यास होत्या

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहत असताना प्रियकराने महिलेच्या दोन चिमुकल्यांवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जालना शहरात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अत्याचार करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरु आहे.  

जालना शहरात सदरची धक्कादायक घटना समोर येत आहे. पीडित चिमुकल्यांची आई ही जुना जालना भागात मोलकरीण म्हणून काम करते. तर तिचा प्रियकर एका हॉटेलात मॅनेजर असल्याची माहिती समोर आली आहे. तर हे दोघेही मागील दोन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये जुना जालना भागात राहत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यांच्यासोबत महिलेच्या दोन मुली देखील वास्तव्यास होत्या. 

दरम्यान लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या महिलेच्या प्रियकरानेच दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रशांत प्रकाश वाडेकर असं या नराधमाचे नाव असून त्याने सहा आणि चार वर्षीय चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केल्याच समोर आल आहे. सदर प्रकार लक्षात आल्यानेने चिमुकल्यांच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली. 

पोलिसांनी घेतले ताब्यात 

याप्रकरणी जालन्यातील कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर घटनेचा तपास करत पोलिसांनी संशयित आरोपी प्रशांत प्रकाश वाडेकर याला अटक केली. यानंतर त्याला कोर्टासमोर नेले असता त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान सदर घटनेने जालना शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सीएनजीनं काढला घाम, रिक्षाचालक रांगेत, प्रवासी प्रतिक्षेत

भावासाठी ठाकरेंचा काँग्रेसवर घाव, बिहार निवडणुकीत राज नव्हते तरीही हार

Shocking: बेळगावात भयंकर घडलं! घरातलं ऑक्सिजनचं संपलं, शेकोटीनं घेतला तिघांचा जीव

Wednesday horoscope : आयुष्यातील अडचणी दूर होणार; ५ राशींच्या लोकांना सुख आणि आनंदाचे दिवस येणार

निवडणुकीआधी लाडकीला दिलासा, ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT