jalna crime news  saam tv
महाराष्ट्र

Crime : जालना हादरलं; घरात एकटं पाहून तरुणाचा १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार

१९ वर्षीय तरुणीवर घरात एकटी असल्याचं पाहून बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

लक्ष्मण सोळुंके

Jalna News : जालना शहरातून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. १९ वर्षीय तरुणीवर घरात एकटी असल्याचं पाहून बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची घटना घडली आहे. सदर प्रकार ९ जून आणि १८ जून रोजी घडल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने जालना शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, जालना शहरातील यशवंत नगर परिसरात राहणाऱ्या कुटुंबातील १९ वर्षीय तरुणी घरात एकटी असल्याची संधी साधत तरुणाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याच तरुणाने ९ जून रोजी मुलीला जीवे मारण्याची धमकी देत 'मी तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्याशीच लग्न करेल', असं म्हणत तरुणीवर अत्याचार केला. या बाबत कुणाला काही सांगितल्यास तुला जीवे मारेल अशी धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे.

१८ जून रोजी चंद्रकांत घुले,रेखा घुले आणि अंबादस सुरासे यांनी यशवंत नगर येथे येऊन तरुणीला धमकी देत तिला बळजबरीने पळून नेऊन मधूबन कॉलनीत डांबून ठेऊन महादेव घुले यांच्या सोबत शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा प्रकार घडला आहे. तरुणीचे अश्लील छायाचित्र काढून बदनामी करण्याची धमकी देत बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे.

एक महिन्यानंतर तरुणींनी सुटका करत पळ काढून आईचं घर गाठत सर्व प्रकार सांगितला. समाजात बदनामी होऊ नये म्हणून तरुणी गप्प राहिली होती. परंतु तरुणाने पुन्हा तरुणीला अश्लील छायाचित्रे समाज माध्यमावर व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा शारिरीक सुखाची मागणी केली.

त्यानंतर बदनामीच्या भीतने आईसह तरुणीने कदीम जालना पोलीस ठाणे गाठत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपीसह आणखी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करत या प्रकरणांचा अधिक तपास पोलीस करत आहे. सदर तपास पिंक मोबाईल पथकाच्या साहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती बनसोडे यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पार्टी ऑल नाईट! पुणेकरांचा 31st रात्रभर गाजणार; पब, रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरू राहणार, वाचा

Virat Kohli : विराट कोहलीचा नवा विक्रम; सचिन तेंडुलकरच्या स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री

Namo Bharat Express: नमो भारत ट्रेनमध्ये ठेवले शरीरसंबंध, तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याची गेली नोकरी

Maharashtra Live News Update: काँग्रेससोबत आघाडी होणार नाही, वंचितकडून मोठी घोषणा

Mrunal Thakur: मराठमोळी थोडीशी साधीभोळी; धुळ्याची लेक पैठणीत दिसतेय लय भारी

SCROLL FOR NEXT