Jalna crime News AI Image
महाराष्ट्र

Jalna : प्रोटीन पावडरचा वाद जीवावर बेतला, जिम ट्रेनरची धारदार शस्त्राने हत्या; जालन्यातील धक्कादायक घटना

Jalna Crime News : जालना शहरात जिम ट्रेनर राहुल राजपूत याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आली. याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, प्रोटीन पावडरच्या व्यवहारातुन हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

Alisha Khedekar

  • जालना शहरातील धक्कादायक घटना

  • जिम ट्रेनर राहुल राजपूत याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला

  • प्रोटीन पावडरच्या पैशांच्या वादावरून हत्या

  • पोलिसांकडून तपास सुरु

गणपती विसर्जनाच्या दिवशीच जालना शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील लोधी मोहल्ला परिसरात आज सकाळी एका जिम ट्रेनरवर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल राजपूत हा जिम ट्रेनर म्हणून काम करत होता. आज सकाळी साधारण सहा वाजण्याच्या सुमारास तो लोधी मोहल्ला परिसरात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. आरोपींनी धारदार शस्त्राने राहुलवर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर राहुल रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहून स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली.

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर जखमी राहुलला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केलं. दरम्यान, या हत्येमागे पाच हजार रुपयांच्या प्रोटीन पावडरच्या व्यवहारातून झालेला वाद कारणीभूत असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. संबंधित वादातून आरोपी आणि राहुल राजपूत यांच्यात यापूर्वीही वाद झाला होता का, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.

घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. फुटेजच्या आधारे पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असून, त्यांची चौकशी सुरू आहे. या हत्येमागील नेमकं कारण, आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास केला जात आहे. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा बंदोबस्त असतानाच ही घटना घडल्याने परिसरात चर्चेला उधाण आलं आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यासाठी रवाना

Bombay High Court: महाराष्ट्रात दिवाळीत फटाके फोडण्यास बंदी, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!

Maharashtra : महाराष्ट्रात FDA ची धडक कारवाई; ७८.४९ कोटींचे अन्नपदार्थ जप्त

महाराष्ट्राच्या दोन लेकींची मोठी झेप! क्रिकेट संघात मिळाली संधी

Upvasachi Lassi Recipe : नवरात्री स्पेशल! अवघ्या ५ मिनिटांत बनवा थंडगार मलाईदार लस्सी

SCROLL FOR NEXT