Jalna Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalna Crime News: घरात द्यायचा नेहमी त्रास..वडील, भाऊ अन्‌ मुलानेच केला खून; मृतदेह जाळून पुरावा केला नष्ट

घरात द्यायचा नेहमी त्रास..वडील, भाऊ अन्‌ मुलानेच केला खून; मृतदेह जाळून पुरावा केला नष्ट

लक्ष्मण सोळुंके

जालना : घरात सतत त्रास देत असल्याच्‍या कारणावरून वडील, भाऊ आणि मुलांनी संगणमत करून शेतात घेऊन जात हातपाय बांधून लाकडी दांड्याने मारहाण करत मुलाचा (Crime News) खून केला. ही दुर्दैवी घटना अंबड तालुक्यातील (Jalna News) शिरनेर गावातील शिवारात घडली आहे. (Maharashtra News)

धर्मराज वैद्य असं खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून धर्मराज हा दारूचा नशेत घरात नेहमी वाद घालत असायचा. या नेहमीच्याच वाद घालण्याला घरातील वडील, भाऊ आणि मुलगा त्रासले होते. दरम्‍या १५ मे रोजी सोमवारी एका खबऱ्यामार्फत पोलिसांना आरोपी नारायण चिमाजी वैद्य हे मुलगा कर्णराज नारायण वैद्य व नातू निर्गुन धर्मराज वैद्य हे कुणाला काही न सांगता धर्मराज वैद्य याचा अंत्यविधी उरकवून घेत असल्याची माहिती पोलिसांना (Police) मिळाली होती.

मारहाणीत मृत्‍यू

माहितीवरून पोलिसांनी अंत्यविधी झालेल्या ठिकाणी जाऊन पंचनामा करत तपासाची चक्र फिरवली. धर्मराज वैद्य हा नेहमी घरी वाद करुन त्रास देत असल्यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळुन मयताचे वडिल, भाऊ आणि मुलगा या तिघांनी मिळून धर्मराजला शेतात नेऊन काठीने हातापायांवर मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा दुर्दैव मृत्यू झाला.

मृतदेह शेतातच जाळला

सदरची बाब कोणाच्‍याही लक्षात येऊ नये; म्हणून सर्वांनी संगणमत करून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने कुठलाही अंत्यविधी पुर्वीचा विधी न करता मयत धर्मराज याचा मृतदेह जाळुन पुरावा नष्ट केल्याचे तपासात उघड झाले. यानंतर आरोपींनी कबुली जबाब दिल्यामुळे पोलिसांनी आरोपी नारायण चिमाजी वैद्य, कर्णराज नारायण वैद्य, निर्गुन धर्मराज वैद्य यांच्या विरोधात संगणमत करून खून केला प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास अंबड पोलीस करत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बदलापुरात भूसंपादनाचा मोबदला लाटल्याचा धक्कादायक प्रकार

Raksha Bandhan 2026 : 27 की 28 ऑगस्ट रक्षाबंधन कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि मुहूर्त

Property Rights: एखाद्या विधवेने मूल दत्तक घेतले, तर मुलाला पतीच्या मालमत्तेत हिस्सा मिळेल का? कायदा काय सांगतो?

Maharashtra SIR Update : महाराष्ट्रातील २ कोटी मतदार वगळणार?

Mumbai : मुंबईत धावत्या लोकलवर दगडफेक; तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, कठोर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT