Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna : आंब्याच्या झाडाला दगड मारल्याने दोन गटात हाणामारी; दोघे जखमी, महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल

Jalna News : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध शिवारात जुना वाद आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून आणि आंब्याच्या झाडाला दगड मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांत जोरदार हाणामारी झाली

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: शेतीचा जुना वाद सुरु असून याच जुन्या वादातून दोन गट एकमेकांच्या समोर आले. दोन्ही गटांमध्ये आंब्याच्या झाडाला दगड मारल्याच्या कारणावरून वाद होऊन बेदम हाणामारी झाल्याची घटना जालन्यातील भोकरदन तालुक्यातील पारध शिवारात समोर आली आहे. या हाणामारीमध्ये दोघेजण जखमी झाले असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध शिवारात जुना वाद आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून आणि आंब्याच्या झाडाला दगड मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. सदर घटना ११ जूनला दुपारच्या सुमारास घडली. यात दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान हाणामारीच्या घटनेत वैभव लोखंडे आणि हर्षल पवार हे दोघे जखमी झाले आहेत. 

शेतात आंब्याचे झाड आहे सामायिक 

दरम्यान गोपाल लोखंडे यांनी भोकरदन पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा भाऊ वैभव लोखंडे आणि मित्र हर्षल पवार यांच्यासोबत पारध शिवारातील शेतात होते. त्यावेळी अनिकेत लोखंडे, दत्ता त्र्यंबक लोखंडे, अरुण त्र्यंबक लोखंडे आणि दोन महिला तिथे आले. यातील आरोपी आणि फिर्यादी यांच्यात शेतीचा जुना वाद आहे. मात्र घटनेच्या दिवशी जुन्या भांडणावरून तसेच सामाईक आंब्याच्या झाडाला दगड मारल्याच्या कारणावरून वैभव लोखंडे आणि हर्षल पवार याना मारहाण केली.

चौघांवर गुन्हा दाखल 

या मारहाणीत वैभव व हर्षल जखमी झाले असून घटनेनंतर जखमी वैभव लोखंडे आणि हर्षल सांडु पवार यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी जालन्यातील पारध पोलीस ठाण्यात एका महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे. दरम्यान हाणामारीचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, 22 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

Caramel Custard Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग, घरी बनवा रेस्टॉरंटस्टाईल क्रीमी कॅरॅमल कस्टर्ड, वाचा रेसिपी

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

SCROLL FOR NEXT