Jalna Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalna Crime News: रस्त्यात गाडी अडवून केला गोळीबार; अंबडजवळील मार्डी रोडवरील घटना

रस्त्यात गाडी अडवून केला गोळीबार; अंबडजवळील मार्डी रोडवरील घटना

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालना जिल्ह्यातल्या अंबडमध्ये एकावर रात्री दोन अनोळखी इसमांनी गोळ्या झाडून हल्ला (Jalna News) केल्याची घटना घडली. या घटनेत राधाकिसन पुंडलिक पिवळ हे गंभीर जखमी झाले आहेत. (Live Marathi News)

जालना जिल्‍ह्यातील अंबडमध्‍ये मध्यरात्रीच्या सुमारास राधाकिसन पिवळ हे वाईन शाॅप बंद करून दुचाकीवरून मार्डी रोडने घरी जात होते. या दरम्‍यान चव्हाण यांच्या शेताजवळ पिवळ यांना दोन अनोळखी इसमांनी दुचाकीवर (Crime News) येऊन अडविले. त्यांच्या जवळील असलेली पैशांची बॅग मागितली असता राधाकिसन पिवळ यांनी त्यांना बॅग देण्यास नकार दिला. त्यावेळी या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्यावर गोळ्या झाडण्यास सुरवात केली आणि त्यांच्याजवळ असलेली पैशांची बॅग घेवून पसार झाले.

गोळीबारात राधाकिसन हे गंभीर जखमी झाले असून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे खाजगी रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांना याची माहिती मिळाली असता घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून दोन अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकारणी अधिक तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lek Ladki Yojana : मुलींसाठी सरकारची मोठी योजना! ₹1.01 लाख थेट मदत; फक्त या कुटुंबांनाच मिळणार लाभ

Maharashtra News Live Update: गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यास निर्बंध

गवतावर चालल्याने रक्तदाब सुधारतो का? जाणून घ्या

Phone Pe Update : आता इंटरनेट नसतानाही पाठवा पैसे; PhonePe ची भन्नाट सुविधा

PM Modi: परदेशात जाणं टाळा, सोनं खरेदी करु नका; PM मोदींच्या 'त्या' व्हिडीओनंतर देशवासीय पुन्हा संभ्रमात

SCROLL FOR NEXT