Beed News
Beed NewsSaam Tv

Beed News: केज तालुक्यातील काही भागात मुसळधार पाऊस; वीज पडून एक गाय दगावली तर पुराच्या पाण्यात म्हैस गेली वाहून

गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने, बीडच्या केज तालुक्यातील काही भागात हजेरी लावलीय.
Published on

Beed Rain Update: गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने, बीडच्या केज तालुक्यातील काही भागात हजेरी लावलीय. केज तालुक्यातील माळेगाव, सुर्डी, सोनेसांगवी, मांगवडगाव,सुकळी, गोटेगाव परिसरात जवळपास 2 तास मुसळधार पाऊस झालाय. पहिल्याच पावसात या भागातील नदीनाले वाहू लागले आहेत. तर यावेळी वीज कोसळून एक गाय दगावली असून नदीच्या पुरात एक म्हैस देखील वाहून गेलीय. (Latest Marathi News)

Beed News
Sanjay Raut News : मुंबई देशाची आर्थिक राजधानी खरंच आहे ना? PM मोदींच्या अमेरिका दौऱ्यावर संजय राऊतांचा फडणवीसांना प्रश्न

या दुर्घटनेत केजच्या माळेगाव येथील अरुण चंद्रसेन गव्हाणे यांची घराजवळ चिंचाच्या झाडाखाली बांधलेली गाय वीज पडून दगावलीय. सदरील गाभण असलेली गाय दगावल्याने शेतकऱ्याचे (Farmer) 80 हजार रुपयांचे नुकसान झाले. तर मांगवडगाव येथील कल्याण गायके हे बैलगाडीतून कुटूंबीयासह घरीं परतत होते. यादरम्यान बैलगाडीच्या मागे म्हैस होती. ती ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेली. (Beed News)

Beed News
Goods Trains Collide In West Bengal: पश्चिम बंगालमध्ये मोठा रेल्वे अपघात; एका मालगाडीची दुसऱ्या मालगाडीला धडक, 12 डबे रुळावरून घसरले (पाहा व्हिडिओ)

दरम्यान बीड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये रिमझिम, मध्यम व जोरदार पाऊस झाला आहे.गेल्या 2 दिवसांपासून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते. मात्र काल सायंकाळी आणि रात्री पाऊस (Rain) झाल्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झालाय. यामुळं मागील काही दिवसांपासून उष्णतेचा सामना करत असलेल्या जनतेला दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com