Jalna News Saam Digital
महाराष्ट्र

Jalna News: भाजप कार्यकर्ते-मराठा आंदोलक आमने सामने, घटनास्थळी तणाव

Jalna News: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या गाव बंदीच्या निर्णयाला बगल देत भाजपने बदनापूर शहरात बस स्थानकाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Jalna News

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या गाव बंदीच्या निर्णयाला बगल देत भाजपने बदनापूर शहरात बस स्थानकाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विधानसभचे आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते हा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार होता. मात्र मराठा समाजाचे कार्यकर्ते कार्यक्रमस्थळी दाखल झाले आणि आमदार नारायण कुचे यांचा निषेध करताना जोरदार घोषणाबाजी केली. तसेच कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमात असलेले भाजप कार्यकर्ते आणि मराठा आंदोलक आमने सामाने आल्याने एकच गोधळ उडाला. दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वाद टळला आहे. मात्र यावेळी मराठा समाजाच्या वतीने कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे घटनास्ळी काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. या तणावामुळे काहीवेळ संभाजीनगर जालना महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेले आमरण उपोषण स्थगित केले आहे. तरी राज्यभर मराठा आंदोलकानी आरक्षणाचा लढा सुरूच ठेवला आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांना केलेला गाव बंदीचा निर्णय अद्याप कायम आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणादरम्यान अनेक आमदार, खासदारांचे कार्यक्रम उधळण्यात आले. गावातून माघारी पाठवले. त्यामुळे राजकीय नेत्यांना कार्यक्रम, दौरे रद्द करावे लागले होते.

सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन हिवाळी अधिवेशनात आरक्षणाचा प्रस्ताव मांडण्याची ग्वाही दिली. त्यामुळे जरांगे पाटील यांनी उपोषण २ जानेवारीपर्यंत स्थगिक केले आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी रद्द केलेले कार्यक्रम, दौरे पुन्हा सुरू केले आहेत. मात्र मराठा आंदोलकांकडून अद्यापही राजकीय नेत्यांना गाव बंदी करण्यात येत आहे. त्यामुळेच जालण्यातील बदनापूर शहरातील उद्घाटनाचा कार्यक्रम उधळवून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning Tips: अंथरूणातून उठल्यानंतर या सवयी पाळा, भविष्यात होईल फायदा

WTC Points Table: भारताच्या विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; पाहा भारत कोणत्या स्थानावर?

Maharashtra Live News Update : विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभा असलेल्या भाविकाला सुरक्षा रक्षकाची काठीने बेदम मारहाण

Eye Infection: पावसाळ्यात डोळ्यांना संसर्ग होण्यापासून सुरक्षित ठेवा, जाणून घ्या महत्वाच्या सोप्या टिप्स

Ladki Bahin Yojana: वेळेवर ₹१५०० मिळत नाहीत, लाडकी बहीण योजना बंद करा, राज्यातील महिलांची मागणी

SCROLL FOR NEXT