jalna news
jalna news  saam tv
महाराष्ट्र

Jalna : रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांनी नागरिक वैतागले; केले अनोखे आंदोलन

लक्ष्मण सोळुंके

जालना: पावसाळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे काही जणांच्या मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. या खड्ड्यांनी त्रस्त झालेल्या नागरिकांकडून आंदोलन करण्यात येते. आतापर्यंत नागरिक, विविध पक्षांच्या राजकीय कार्यकर्त्यांनी खड्ड्यांना फूल-हार वाहून, खड्ड्यात वृक्षारोपण, वाढदिवस साजरा करून अशी विविध पद्धतीने आंदोलन करण्यात आलं आहे. मात्र, जालन्यात चक्क खड्ड्यांची सजावट करवून खड्डयात गव्हाची पेरणी करत आंदोलन केलं आहे. सदर अनोखे आंदोलन जालना (Jalna) शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. (Jalna News In Marathi )

जालना शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मुक्तेश्वरद्वार या नवीन जालना शहरातील मुख्य रस्त्याला गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांचा नागरिकांना यांचा त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांकडून अनेक वेळा निवेदन देण्यात आलं आहे.

मात्र, प्रशासनाकडून कुठलीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे त्रस्त नागरिकांनी खड्ड्यांचा प्रश्न न सोडवल्याने आज अचानक परिसरात बाँड-बाजा वाजवत खड्ड्यांची फुलांनी सजावट करत या खड्ड्यात गव्हाची पेरणी करायला सुरुवात केली. त्यानंतर या अनोख्या आंदोलनाची (Agitation) चर्चा संपूर्ण शहरभर पसरली.

दरम्यान, या अनोख्या आंदोलनाची माहिती मिळताच नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी तत्काळ आंदोलनास्थळी अभियंत्यांना पाठविले. मुख्यधिकाऱ्यांनी या आंदोलनाची दखल घेत दोन दिवसांत परिसर खड्डेमुख्त करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर नागरिकांनी हे आंदोलन मागे घेत तत्काळ रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी करत दोन दिवसांत खड्डेमुक्त न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govinda And Krushna Abhishek : कृष्णा- गोविंदा वादाचं नेमकं कारण काय?; गोविंदा जरा स्पष्टच बोलला

Today's Marathi News Live: भाजपचे पुण्यातील उमेदवार यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे घेणार सभा

Raireshwar Fort: १६० मतदारांसाठी अधिकारी, कर्मचा-यांचा ४ हजार ५०५ फुटापर्यंत ट्रेक, रायरेश्वर केंद्र मतदानासाठी सज्ज

Black Pepper Benefits: काळी मिरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, घ्या जाणून

Marathi Manus : नोकरीत मराठी माणूस नको! का? संताप-राग-खंत... मराठी तरूणांच्या भावना आल्या उफाळून

SCROLL FOR NEXT