Jalna News Saamtv
महाराष्ट्र

Jalna Accident News: अवैध मुरुम वाहणाऱ्या भरधाव टिप्परची धडक! पैठणच्या डाव्या कालव्यात दुचाकीसह २ जण बुडाले; अपघातात एक जखमी

Paithan Canal News: सध्या नागरिकांकडून वाहून गेलेल्या दोघांचा शोध सुरु आहे.

Gangappa Pujari, लक्ष्मण सोळुंके

Jalna Accident News: जालण्याच्या पैठणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवैध मुरमाची वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी तर दोन जण दुचाकीसह पैठणच्या डाव्या कालव्यात बुडाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून बुडालेल्या दोघांचा शोध सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पैठणच्या (Paithan) वडीगोद्री शिवारातून वाहणाऱ्या डाव्या कालव्यात दोन जण बुडाल्याची घटना समोर आली आहे. हे दोघेही जोगलादेवी येथील राहिवाशी असल्याची माहिती प्राथमिक माहिती समोर आली आहे. अवैध मुरमाची वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने कालव्या जवळून जाताना एका भंगारचा व्यवसाय करणाऱ्या दुचाकीला धडक दिल्यानंतर त्याने समोर जाणाऱ्या दुसऱ्या दुचाकीला धडक दिली

या धडकेने समोरील दुचाकीवरील दोघे जण दुचाकीसह कालव्यात पडून वाहून गेले. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी कालव्याच्या परिसरात एकच गर्दी केली आहे. सध्या नागरिकांकडून वाहून गेलेल्या दोघांचा शोध सुरु आहे. (Latest Marathi News)

याबाबतची माहिती मिळताच गोदी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच या टिप्पर चालकालाही ताब्यात घेतले आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकांकडून वारंवार अशा अपघाताच्या घटना समोर येत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. (Accident News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stray Animal Attack : मुलासाठी आई बनली ढाल! मोकाट जनावराने मुलाला पायदळी तुडवलं, पण मातेनं वाचवले प्राण, घटना CCTVत कैद

Cancer Risk: कारण नसताना पाठ, छाती किंवा डोकं दुखतंय? असू शकतो कॅन्सरचा धोका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Gold Rate Today: दसऱ्याच्या आदल्या दिवशी सोनं ₹१२०० रुपयांनी महागलं, वाचा २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर

Kalyan : कल्याण डोंबिवलीत वाहतूक कोंडीचा विळखा; नो-एंट्री आदेशानंतरही रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Maharashtra Live News Update: रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

SCROLL FOR NEXT