Marriage Saam tv
महाराष्ट्र

३६ इंच उंचीचा नवरा, ३१ इंच उंचीची नवरी; अनोख्या लग्नसोहळ्याची तुफान चर्चा

नवदाम्पत्यासोबत अनेकांना सेल्फी काढण्याचा मोह देखील आवरता आला नाही.

संजय महाजन

जळगाव : उंची कमी असल्‍याने विवाह कसा जुळेल? हा विचार सातत्‍याने कुटूंबियांच्‍या मनात होता. परंतु, म्‍हणतात ना, लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात; याचा प्रत्यय जळगावात झालेल्‍या विवाह (Marriage) सोहळ्यात आला. ३६ इंच उंची असलेल्‍या संदीप सपकाळे यास ३१ इंच उंची असलेली उज्ज्वला ही अर्धांगिनी म्‍हणून मिळाली. या विवाहाची जळगावात (Jalgaon) चर्चा रंगत आहे. (jalgaon news 36 inch bride and 31 inch bride a unique wedding)

जळगाव शहरातील शनिपेठेतील चौगुले प्लॉट परिसरातील संदीप संजय सपकाळे हा शिक्षित असून तो शहरातील एका नामांकित सुवर्णपेढीत काम करतो. लग्‍नाचे वय झाल्‍याने मुलीचा शोध सुरू होता. परंतु, संदीपची उंची कमी असल्‍याने तशी वधू मिळेल का? या विचारा कुटूंब होते. कमी उंचीच्या वराला वा वधूला आपल्या उंचीच्या अनुरूप जोडीदार मिळणे अधिक अवघड असते. परंतु, नशिबाने संदीपला त्‍याच्‍याच उंचीला समरूप असलेली उज्‍वला हिच्‍याशी विवाह जुळला. जळगावात नुकताच त्‍यांचा विवाह देखील पार पडला. या नवदांपत्यासोबत अनेकांना सेल्फी काढण्याचा मोहदेखील आवरता आला नाही.

अचानक जुळली लग्नगाठ

मुला- मुलींचे लग्न जमवताना देखील अनेक विघ्ने येतात. त्‍यात उंची कमी असल्‍याने लग्‍न जुळविण्यासाठी कसरत ही करावीच लागणार होती. मात्र संदीप व उज्ज्वला यांची लग्नगाठ अचानक जुळून आली. उज्ज्वलाचे वडील सीताराम कांबळे हे जळगावी आले असता त्यांना या स्थळाविषयी कळले होते. यानंतर त्‍यांनी संदीपच्‍या घरी जावून प्रस्‍ताव मांडला असता संदीपच्‍या घरच्‍यांकडून देखील होकार मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT