Corona Update
Corona Update Saam tv
महाराष्ट्र

Jalgoan: कोरोना रुग्णांची शंभरीकडे वाटचाल

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : गेल्‍या काही महिन्‍यांपासून कोरोनामुक्‍त असलेला जळगाव जिल्‍ह्यात पुन्‍हा कोरोना रुग्णांची संख्‍या वाढू लागली आहे. मागील तीन– चार दिवसांपासून सातत्‍याने वाढत असलेल्‍या संख्‍येमुळे (Jalgaon) जिल्‍ह्यातील आकडा शंभरीच्‍याजवळ पोहचला आहे. (Jalgoan corona update news Hundreds of corona patients)

जून महिना सुरू होताच कोरोना (Corona) प्रसार होण्याचा वेग वाढला आहे. पावसाळा आणि हिवाळा या दोन ऋतूत कोरोनाची रुग्णसंख्या वाढेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार संख्‍या वाढत असल्‍याचे चित्र सध्‍या पहावयास मिळत आहे. जळगाव (Jalgaon News) जिल्ह्यात गुरुवार अखेर ९९ रुग्ण उपचाराधीन होते. यामध्ये सर्वाधिक रुग्ण एकट्या जळगावात आहेत.

जळगावात अधिक रूग्ण

जळगाव शहरात उपचार घेत असलेल्या ३२ रुग्णांमुळे सर्वांच्याच मनात धडकी भरली आहे. दरम्‍यान गुरुवारी जिल्ह्यात कोरोनाचे १२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये जळगाव शहरातील रुग्णांचाही समावेश आहे. अँटीजनच्या १३१ पैकी अहवालांपैकी ४ पॉझिटीव्ह आहेत. बरे झालेले रुग्ण आठ असून गेल्या २४ तासात आरटीपीसीआरचे ८४ नमुने तपासणीसाठी आले होते. त्यातील आठ पॉझिटीव्ह प्रलंबित अहवालांची संख्या शून्य आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded Temperature : नांदेड जिल्ह्यात उच्चांकी तापमानाची नोंद; पारा पोहचला ४३ अंशाच्या वर

Explainer : लोकल प्रवाशांची सहनशीलता संपलीय का? तुम्हाला काय वाटतं?

Today's Marathi News Live : मला मिळालेला प्रतिसाद १००१% निवडून येण्यासारखा; अर्चना पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

Yoga Tips: योगा करताना 'या' चुका टाळा अन्यथा होतील गंभीर परिणाम

Prasad Khandekar Birthday : 'पश्या खूप मोठा हो, यशाचे शिखरं गाठ...' नम्रता संभेरावने दिल्या प्रसाद खांडेकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT