Saam tv Jalgaon News
महाराष्ट्र

Jalgaon : गोंधळाचा कार्यक्रम आटोपून नदीवर गेले असता घडले दुर्दैवी; मायलेकासह मावशीचा बुडून मृत्यू

Jalgaon yawal News : अंजाळे (ता. यावल) येथे घाणेकर नगरातील बादल भिल यांच्याकडे रविवारी गोंधळाचा कार्यक्रम होता. यासाठी हे तिघे अंजाळे येथे आले होते. रविवारी गोंधळाचा कार्यक्रम आटोपला होता.

Rajesh Sonwane

जळगाव : नातेवाईकाकडे गोंधळाचा कार्यक्रम असल्याने दोन दिवसांपासून गावी आले होते. रविवारी कार्यक्रम आटोपल्यानंतर सकाळी उठून नदीवर गेले. तापी नदीत उतरले असता दोन्ही बहिणींसह एका चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना यावल तालुक्यात घडली आहे. सदरची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली असून सायंकाळी तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. 

यावल तालुक्यातील अंजाळे शिवारात सदरची घटना घडली आहे. सदर घटनेत वैशाली सतीश भिल (वय २८), त्यांचा मुलगा नकुल सतीश भिल (वय ५, दोन्ही रा.अंतुर्ली, ता. अमळनेर) आणि सपना गोपाल सोनवणे (वय २७, रा. पळाशी, ता. सोयगाव) असे मृत झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान वैशाली भिल व सपना सोनवणे या दोन्ही बहिणी असून त्या अंजाळे येथे गोंधळाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या होत्या. 

रविवारी आटोपला कार्यक्रम 

अंजाळे (ता. यावल) येथे घाणेकर नगरातील बादल भिल यांच्याकडे रविवारी गोंधळाचा कार्यक्रम होता. यासाठी हे तिघे अंजाळे येथे आले होते. रविवारी गोंधळाचा कार्यक्रम आटोपला होता. यामुळे बरेच जण अंजाळे येथे मुक्कामी होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी वैशाली व सपना या नकुलला घेऊन गावापासून जवळच असलेल्या तापी नदीवर अंघोळ व कपडे धुण्यासाठी गेले होते. मुलाला घेऊन दोघी बहिणी नदीत उतरल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेजण नदीत बुडाले. 

तिघांचे मृतदेह काढले बाहेर 

बराच वेळ होऊन देखील वैशाली व सपना घरी न आल्याने नातेवाईकांनी नदीवर जाऊन पाहणी केली. यावेळी नदी काठावर कपडे पडून दिसले. यानंतर घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत यावल पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी येत तपस केला. गावातील नागरिकांच्या मदतीने सायंकाळी तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT