Jalgaon Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime : मुलाने केली पित्याची हत्या; लग्न करून देत नसल्याचा राग

Jalgaon News : लग्नाचे वय होवूनही त्याचे लग्न होत नव्हते. त्यामुळे पिता रतनसिंग यांच्याकडे मुलाने लग्न करून देण्यासाठी सातत्याने तगादा लावला होता.

Rajesh Sonwane

जळगाव : लग्नाचे वय होऊन देखील वडीलांकडून लग्न करून देण्यासंदर्भात कोणताही प्रतिसाद नव्हता. याचा मनात राग धरून मुलाने वडिलांची हत्या केल्याची घटना यावल (Yawal) तालुक्यातील एका गावात १४ जानेवारीला घडली आहे. (Breaking Marathi News)

पिळोदा खु. (ता. यावल) येथे ही धक्कादायक घटना घडली असून या घटनेत रतनसिंग तानसिंग कोळी (वय ७३) यांचा (Crime News) खून झाला आहे. रतनसिंग कोळी हे पत्नी व मुलगा देवानंद यांच्यासमवेत पिळोदा येथे वास्तव्यास होते. (Jalgaon) संशयित देवानंद कोळी याचे लग्नाचे वय होवूनही त्याचे लग्न होत नव्हते. त्यामुळे पिता रतनसिंग यांच्याकडे मुलाने लग्न करून देण्यासाठी सातत्याने तगादा लावला होता. मात्र ते टाळाटाळ करीत असल्याने संतप्त होऊन वडिल झोपले असता त्यांच्या डोक्यात कुन्हाडीचे वार करत हत्या केली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुलगा पोलिसांच्या ताब्यात 

सदरच्या घटनेनंतर गावात खळबळ उडाली. आरोपी मुलाविरोधात सुभाबाई रतन कोळी (वय ६०) यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा (Police) दाखल करण्यात आला. याप्रकरणी संशयित देवानंद कोळी याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला यावल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail cancer signs: नखांवर काळी रेघ दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका; कॅन्सरचं लक्षण असल्याचं तज्ज्ञांचं मत

भाजपने शेवटच्या क्षणी काढलं मराठी कार्ड; मित्रपक्षाचा बडा नेताही फोडला

Maharashtra Live News Update: पतंग उडवताना इलेक्ट्रिक शॉक लागून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू

Bajra Bhakri Recipe: भाकरी थापायला जमत नाही? मग लाटण्याने बनवा मऊ आणि टम्म फुगणारी बाजरीची भाकरी, सोपी आहे पद्धत

Dog Killing Case : निवडणुकीतलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी आठवडाभरात ५०० कुत्र्यांना ठार मारलं, अनेक गावांमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT